Sakshi Sunil Jadhav
स्लीव्हलेस ब्लाऊज हा आजच्या ट्रेंडमध्ये खूप वापरला जात आहे. योग्य साडी निवडली तर हा ब्लाऊज तुमचा लूक स्टायलिश, स्मार्ट आणि एलिगंट बनवतो. कसा हे जाणून घेण्यासाीठी पुढील माहिती नक्की वाचा.
तुम्ही सणावाराला कांजीवरम, पैठणी किंवा बनारसी सिल्क साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज वापरु शकता. याने एलिगंट लूक येतो. हे कॉम्बिनेशन लग्न, रिसेप्शन आणि सणांसाठी परफेक्ट आहे.
हलकी आणि फ्लोई शिफॉन साडी स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत ग्रेसफुल दिसते. पार्टी, कॉकटेल किंवा ऑफिस फंक्शनसाठी हा बेस्ट ऑप्शन असतो.
जॉर्जेट साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज केल्यास स्लिम आणि मॉडर्न लूक मिळतो. तरुणींमध्ये हे कॉम्बिनेशन जास्त पसंत केले जाते.
प्लेन साडीवर एम्ब्रॉयडरी किंवा डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज घातल्यावर लूक लगेच उठून दिसतो. कमी दागिन्यांमध्येही स्टायलिश लूक मिळतो.
फ्लोरल किंवा प्रिंटेड साडीवर साधा स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच होतो. डेली वेअर किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा पर्याय बेस्ट आहे.
उन्हाळ्यात कॉटन साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज रिलॅक्स आणि स्टायलिश वाटतात. ऑफिस किंवा कॉलेज कार्यक्रमांसाठी हे कॉम्बिनेशन योग्य आहे.
पांढऱ्या साडीवर कॉन्ट्रास्ट स्लीव्हलेस ब्लाऊज केल्यास लूक खूप क्लासी दिसतो. सणासाठी, पूजेसाठी हा ट्रेंड तुम्ही फॉलो करू शकता.