Sakshi Sunil Jadhav
2026 नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाची मकर संक्रांत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास मानली जात आहे.
2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, जो अत्यंत शुभ मानला जातो.
यंदा मकर संक्रांतीला षटतिला एकादशीचा शक्तिशाली संयोग जुळून येणार आहेत. हा बदल तब्बल 19 वर्षांनंतर होत आहे.
याआधी हा दुर्मिळ योग 15 जानेवारी 2007 रोजी जुळून आला होता. शास्त्रांनुसार, या महायुतीमुळे भगवान विष्णू आणि भगवान सूर्य यांची विशेष कृपा लाभते.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक प्रगती, योग्य निर्णय आणि आरोग्य सुधारणा घेऊन येईल.
वृश्चिक राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, आरोग्य सुधारणा आणि व्यवसायात गती मिळेल.
मीन राशीच्या लोकांना पैशाची कमतरता भासणार नाही, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक सुख वाढेल.
19 वर्षांनंतर येणाऱ्या या महायोगामुळे या तीन राशींच्या आयुष्यात मानसिक शांती, पैसा आणि स्थैर्य वाढणार आहे.