Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया
गौतमीसाठी माईक आणला खाली
काँग्रेसने आज चंद्रपुरात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना उतरवले. जाहीर सभेत त्यांना भाषणासाठी बोलावण्यात आले. भाषण देताना माईक जरा उंच होता. त्यामुळे भाषण द्यायला अडचण होत असल्याचे लक्षात आल्यावर गौतमी यांच्या अंगरक्षकाने तो खाली आणला. यामुळे गौतमीने सुहास्य केली आणि उपस्थितांनीही दाद दिली.
सोलापुरात शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमचे कार्यकर्ते आले समोरासमोर
नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया
कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी
कल्याणमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. पॅनल क्रमांक दोनमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान योगिधाम परिसरात अचानक स्फोट होऊन एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे.
पुणे शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी
पुणे शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी
दुपारी ढगाळ वातावरणानंतर उपनगरात हलक्या सरी
ऐन जानेवारी महिन्यात आलेल्या पावसामुळे पुणेकरांची धांदल
मालेगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांकडून रूट मार्च
नाशिकच्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगाव पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. किदवाई रोड ते नवीन बस स्थानक मार्गे संवेदनशील भागांमध्ये हा रूट मार्च पार पडला. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली असून सुमारे दोन हजारांहून अधिक अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. शहरात सुरक्षित वातावरण ठेवण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला.
उल्हासनगरमध्ये रिक्षामधून 18 ते 20 लाखाची रोकड पकडली
उल्हासनगर मध्ये 18 ते 20 लाखाची रोकड पकडली
अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी पाठलाग करून हि कॅश पकडली
सुभाष टेकडी चौकात पकडली रिक्षा
रिक्षा चालक आणि रोकड पोलिसांच्या ताब्यात
एका रिक्षात ही कॅश आढळले असून महानगरपालिका समोर असलेल्या भाजप प्रवक्ते प्रदीप रामचंदानी आणि यांच्या कार्यालयातून ही केस निघाल्याचे नरेश गायकवाड यांचे म्हणणं आहे.
बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली
नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग वर आज सायंकाळच्या सुमारास अकोल्या वरून खामगावकडे भरधाव वेगाने येणारी कार शहरा बाहेर एका डिव्हायडरवर आदळली. यामुळे कारचा अपघात होऊन तीन पलट्या कारने खाल्ल्यानंतर कार सरळ उभी झाली. अपघातामध्ये सुदैवाने कार मधील दोघांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना एका दुकानातील सीएसटीव्हीमध्ये कैद झाली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई.
क्राईम ब्रांचच्या पथकाकडून पुणे येथील डिझाईन बॉक्स ऑफिसमध्ये कागदपत्रांची तपासणी व चौकशी.
ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही; तपास सुरू.
प्रकरणासंदर्भात पुढील माहिती व अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा.
आमच्या सर्वेनुसार 125 नगरसेवक पुणेकर निवडून देतील असा विश्वास- मुरलीधर मोहोळ
महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणेकरांनी आम्हाला प्रचाराच्या वेळी प्रचंड प्रतिसाद दिला
आमच्या सर्वेनुसार 125 नगरसेवक पुणेकर निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे
निवडणूक महानगरपालिकेचे नाही तर देशातील चौथ्या नंबरचे शहर पुणे आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा निधीसाठी पुणेकर भाजपाला मत करतील मला विश्वास आहे भाजपाचा महापौर होईल
पुणेकरांसाठी काय केलं आणि काय करणार आहोत हे सर्व प्रचाराच्या काळात आम्ही पुणेकरांना सांगितलं काही सूचनाही मागवण्यात त्याचा उल्लेख आम्ही संकल्प पत्रात केला आहे
गेल्या पाच वर्षात उड्डाणपूल नदी सुधार प्रकल्प पाण्याचा प्रश्न मेट्रो मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडवणीस यांच्या दूरदृष्टीने विकास केला
प्रचाराच्या निमित्ताने पुणेकरांना काय केलं हे सांगता आलं आणि पुढच्या पन्नास वर्षात काय करणार आहोत हे आम्ही आता सांगितलं आहे
पुणेकरांना हे शहर कुणाच्या हाती सुरक्षित राहील हे माहीत आहे आम्ही पुण्याच्या भविष्याचे पुण्याच्या उद्याच्या प्रगतीचे काम करणारे लोक आहोत
पुणेकर आणि लोकसभा विधानसभेचे दिले तसे पुन्हा एकदा पुण्याचा महापौर हा भाजपाचाच होईल.
मोफत मेट्रो रेल्वे प्रवास म्हणजे खिशात नाही दाना आणि बाजीराव म्हणा असाच प्रकार आहे हे देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे
आम्ही कुठेही व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही विकासाचे या सगळ्या प्रचारादरम्यान आम्ही बोलत राहिले
विरोधकाकडून गुन्हेगारांचे पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिले गेले त्यांचा खरा चेहरा पुढे आला कारण सचिन खरात ने माघार घेतल्यानंतर हे उमेदवार कोणाचे हे आता अजित दादांनी सांगितलं पाहिजे
नवी मुंबई नेरुळमध्ये अडीच लाख रुपये जप्त; मतदारांच्या यादीसह एकाला ताब्यात
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असताना नेरुळ परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस व निवडणूक पथकाने संयुक्त कारवाई करत अडीच लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असून मतदारांची यादी आढळल्याने एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
नेरुळमधील एका भागात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक निरीक्षण पथक व स्थानिक पोलिसांनी छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडून ₹२,५०,००० रोख रक्कम तसेच मतदारांची छायांकित यादी, काही कागदपत्रे व मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही रक्कम मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणार होती का, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा
सूचनेची प्रसिद्धी - १६ जानेवारी
अर्ज दाखल - १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
अर्जाची छाननी - २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघाराची अंतिम मुदत २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत)
उमेदवारी चिन्हे वाटप - २७ जानेवारी
मतदान - ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी - ७ फेब्रुवारी २०२६
१२ जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीची घोषणा
रायगड, रत्नागिरी. सिंदुदुर्ग
पुणे सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर
छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाकडून १९ वॉशिंग मशीन जप्त.....
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
शहादा नगरपालिकेसाठी भाजपाच्या माधुरी मकरंद पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी
ढोल ताशांचा गजरात विजय मिरवणूक काढ त भाजप नगरसेवकांनी केला जल्लोष....
माधुरी पाटील यांना सर्वाधिक वीस मतं मिळत यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागले आहेत तर भाजपाकडून दोन आणि जनता विकासाकडे कडून एक असे स्वीकृत नगरसेवक देखील निवडण्यात आलेत.....
थोड्याच वेळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार
पिंपरी चिंचवड शहरात शेवटच्या दिवस अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भोसरीमध्ये जाहीर सभा
अजित पवार थोड्याच वेळात करणार उपस्थितांना संबोधित...
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात सभा
पुणे -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात सभा
भाजपच्या प्रचाराची सांगता सभा आज पुण्यात
आचारसंहिता जाहीर झाली त्या दिवशी सुद्धा फडणवीस होते पुण्यात
आज प्रचाराची सांगता सभा सुद्धा मुख्यमंत्री यांच्या उपस्थित पुण्यात
Dombivali: डोंबिवली शिंदेसेना- भाजप राडा प्रकरणी भाजप आक्रमक
डोंबिवली शिंदेसेना- भाजप राडा प्रकरणी भाजप आक्रमक
आरोपींच्या अटकेसाठी मूक मोर्चा
डोंबिवलीतील शिवसेना–भाजप हाणामारी प्रकरणाला नवे वळण
आरोपींना अद्याप अटक न झाल्याने भाजप आक्रमक झाली आहे
या पार्श्वभूमीवर डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर परिसरात भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले
Beed: शेत रस्त्याच्या वादातून दोघांना कुऱ्हाड आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण
बीड -
- शेत रस्त्याच्या वादातून दोघांना कुऱ्हाड आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण
- मारहाणीचा व्हिडिओ आला समोर
- बीडच्या माजलगाव तालुक्यातील वांगी येथील घटना
- सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
भाजपच्या बंडखोरांवर भाजप कडून कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात दिसून, त्यामुळे भाजपच्या बंडखोरानी थेट भाजपच्याच उमेदवाराला काही ठिकाणी आव्हान दिले आहे . त्यामुळे अखेर भाजपने नवी मुंबईतील बंडखोरांना निलंबित करण्यात आलं आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात पत्रकार परिषद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात पत्रकार परिषद
शांताई हॉटेल जेधे पार्क रस्ता पेठ येथे पत्रकार परिषद
दुपारी २ वाजता घेणार पत्रकार परिषद
डोंबिवलीत शिवसेना–भाजप हाणामारी प्रकरणाला नवे वळण! दोन्ही गटांवर गुन्हे दाखल, पोलिस बंदोबस्त कडक
डोंबिवली शिवसेना–भाजप हाणामारी प्रकरणात पोलिसांकडून दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल
शिवसेना उमेदवार रवी पाटील व नितीन पाटील यांच्या तक्रारीनुसार भाजप कार्यकर्त्यांवर किरकोळ मारहाणीचा गुन्हा
तर भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेना उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील यांच्यासह तिघांविरोधात जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिका बाहेर राडा
काल उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी नंतर पालिका बाहेर भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
पालिके बाहेर झालेल्या राड्याचे व्हिडिओ आले समोर
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा केला होता पराभव
राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक मिळू नये यासाठी भाजप आणि शिवसेनेची नवी खेळी
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांना वेगळंच वळण मिळालं आहे
निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गट उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक आणि विशेष समितीच्या सभापती पदासाठी अचानक एकत्र आल्याने तळोदा नगरपालिकेतील राजकारण तापलं आहे.
पुण्यात मनसे आणि भाजप आमनेसामने
पुण्यात मनसे आणि भाजप आमनेसामने
पुण्यात आज मनसेची यांचा रोड शो
रोड शो पूर्वी मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये राडा
झेडपी निवडणुकांचं बिगुल आज वाजणार!
झेडपी निवडणुकांचं बिगुल आज वाजणार!
महाराष्ट्रातील मिनी विधानसभेचा धुरळा कोणत्याही क्षणी उडण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.
नालासोप-यात मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली
मतदाराना पैसे वाटप करण्यासाठी नेताना
नालासोप-यात १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली
भाजपा कडून हे पैसे मतदाराना वाटप करण्यात येणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१० लाख ९ हजार रोख रक्कम, दोन अक्टिव्हा गाड्या जप्त करून, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Solapur: सिद्धरामेश्वर यात्रेत संस्कार भारतीकडून सुरूय काढण्यात आल्या भव्यदिव्य रांगोळ्या
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे. या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण ठरतात त्या विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या, संस्कार भारती मागच्या 27 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. यंदा मतदानाचा अधिकार हा मुख्य संकल्प या रांगोळ्यांमध्ये दिसून येतोय.साधारण 150 संस्कार भारतीचे सदस्य या रांगोळ्या साकारण्यासाठी मेहनत घेत आहेत.या रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1 हजार किलो रंग आणि 50 पोते रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.हिरेहब्बू वाड्यापासून साडेतीन किलो मीटर पर्यंत ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
Yavatmal: तुरीच्या गंजीला आग लागून चार लाखाचे नुकसान,यवतमाळच्या घारेफळ येथील घटना
यवतमाळच्या नेर तालुक्यातील घारेफळ येथे तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याने चार लाखाची तूर जळून खाक झाल्याची घटना घडली या घटनेमुळे शेतकरी नेस्तानाबुज झाला असून पोलिसांनी या घटनेचा तपास करावा अशी मागणी दिलेल्या तक्रारीतून केली आहे. अनिल बबनराव खोडे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आपल्या दहा एकर शेतात तुरीचे पीक लावले होते काल त्याची सोंगणी करण्यात आली. व शेतात तुरीची गंजी लावण्यात आली. काल दिवसभर ते शेतात होते यावेळी तुरीची गंजी सुरक्षित होती.दरम्यान गावातील काही लोकांनी तुरीच्या गंजीला आग लागल्याची माहिती त्यांना दिली तेव्हा ते शेतात गेले असता शेतातील तुरीची गंजी पेटत असताना त्यांना दिसली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तूर जळून खाक झाली होती. या आगीत 50 क्विंटल तूर जळून खाक झाली.
Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा पार पडणार आज 'अक्षता सोहळा'
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा अतिशय महत्वाचा असा 'अक्षता सोहळा' आज पार पडतोय.सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर हा विवाह सोहळा पार पडत आहे.सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह यावेळी पार पडतो.साधारण 900 वर्षांची परंपरा असणाऱ्या या अक्षता सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र,तेलंगणा आणि गोव्यातून मोठ्या संख्येने सिद्धरामेश्वर भक्त उपस्थिती लावतात.
Makar Sankranti: मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार
मकर संक्रांतीच्या निमित्ताने उद्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी व वाणवसा घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला भाविक येतात. या दिवशी महिलांना सुलभ व जलद गतीने दर्शन घेता यावे यासाठी बुधवारी विठ्ठल आणि रुक्मिणीची तुळशी व पाद्य पुजा बंद ठेवण्यात येणार आहेत,अशी माहिती मंदिर समितीच्या सदस्या शंकुतला नडगिरे यांनी आज येथे दिली.
Nashik: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारावर ताणली बंदूक
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारावर ताणली बंदूक
नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची दिली धमकी
घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात
बंदुक ताणणारा युवक जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये केला कैद
Nashik: नाशिक महापालिकेसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
नाशिक महापालिकेसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
१२२ जागांसाठी ७२९ उमेदवारांचा प्रचार आज थांबणार
१५ जानेवारीला गुरुवारी १३ लाख ६० हजार ७२२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, तर शुक्रवारी मतमोजणी
शहरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये सर्वाधिक ६६ मतदान केंद्रे
अत्यंत चुरशीच्या लढतीमुळे प्रभाग क्रमांक २५ आणि प्रभाग क्रमांक २६ मध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त
Nashik: नाशिकमध्ये भाजपकडून ५४ बंडखोरांची हकालपट्टी
हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह २० माजी नगरसेवकांचा समावेश
नाशिकमध्ये भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारी ( बंडखोरी ) आणि पक्षाची शिस्त मोडल्याने कारवाई
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून कारवाई
Pune: पुण्यातील मार्केटयार्ड येत्या गुरुवारी राहणार बंद
पुण्यातील मार्केटयार्ड येत्या गुरुवारी राहणार बंद
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय
मार्केटयार्ड व उपबाजार बंद राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी मार्केट येतात येऊ नये असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे
Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या बंगल्यात दरोडाप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
औंध येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीमधील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात मध्यरात्री पडलेल्या दरोड्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका नोकरासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगल्यातील एका नोकराने मध्यरात्रीच्या सुमारास पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले. त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले.
त्यानंतर चोरट्यांनी कपाटातून मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. ही बाब पूजा खेडकर यांनी चतु:शृंगी पोलिसांना कळविली
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता खेडकर दांपत्य त्यांच्या खोलीत पलंगावर बेशुद्ध अवस्थेत होते. एका नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन खेडकर कुटुंबीय आणि इतर नोकरांना बेशुद्ध केल्याचा संशय आहे
Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा देखील शेवटचा दिवस
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा देखील शेवटचा दिवस
पुणे शहरात सर्व पक्षाकडून प्रचार शिगेला
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात
मुख्यमंत्री पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात आज घेणार प्रचार सभा
तर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात एकूण 3 रोड शो चे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात करणार मोठ शक्ती प्रदर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात उमेदवारांच्या प्रचार रॅलीला देणार भेट
सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राज ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिन्ही दिग्गज नेते पुण्यात
जीवघेणा नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यास थेट २५ हजार रुपयांचा दंड
जीवघेणा नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यास थेट २५ हजार रुपयांचा दंड देण्याचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय
मात्र नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास 2.50 लाखांचा दंड
अल्पवयीन मुलाकडे मांजा आढळल्यास पालकांना दंड, वयस्क व्यक्तीकडे मांजा आढळल्यास त्यालाच दंड
सुरुवातीला ५० हजारांचा प्रस्ताव, पालकांच्या विनंतीनंतर २५ हजार निश्चित
विक्रेत्यांवरील दंडाची रक्कम कायम दंड प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे भरावा लागणार, हा नियम केवळ संक्रांतीपुरता नाही, वर्षभर लागू राहणार
दंडाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष खात्यात जमा होणार, महापालिका आणि पोलिसांवर दंड वसुलीची जबाबदारी
क्यूआर कोडच्या माध्यमातून दंड वसुली होणार तात्काळ दंड न भरल्यास १५ दिवसांची मुदत
मानसी दळवी यांचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान
ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून देण्यात येणारा जिजाऊ पुरस्कार या वर्षी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांना देण्यात आला. जिजामाता जन्मोत्सावाच्या कार्यक्रमाचे वेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पुरस्कर देऊन मानसी दळवी यांचा सन्मान जिजाऊ समाधी स्थळ, पाचाड येथे करण्यात आला. यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदना मोरे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Hingoli: पीडीसीसी बँकेची रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पीडीसीसी बँकेतील रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला हिंगोली पोलिसांनी बालाजी तिरुपती येथून अटक केली आहे, या दरोडेखोरांनी बँकेची रेकी करत बँक कर्मचाऱ्याला मारहाण करून सहा लाखांची रोकड पळवली होती दरम्यान हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह
कुरुंदा पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळत बँकेची पळवलेली रोकड जप्त केली आहेत.
Devendra Fadnavis: आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री दुचाकी चालवत करणार रोड शो
- आज प्रचाराचा शेवटचा दिवस, राज्याचे मुख्यमंत्री करणार दुचाकी चालवत करणारा रोड शो ,
- मनपा निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः दुचाकी चालत करणार प्रचार....
- इतवारी परिसरातील भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो राहणार आहेत
- आज सकाळी 11 वाजता या रोडशोचे आयोजन
गुन्हेगार हत्यारांसह वरली मटका चालवणाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपने गुन्हेगार आणि हत्यारांसह वरली मटका चालवणाऱ्यांना उमेदवारी दिलीये.. खोटं असेल तर समोर येऊन सिद्ध करावं, खोटं ठरल्यास आमदारकी पदाचा राजीनामा देऊ, भर प्रचार सभेत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी भाजपला प्रतिआव्हान दिलंय.. भाजपच्या नेत्याने एकही उमेदवार गुन्हेगार आणि वरली मटका चालवणारा नसला तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ... आज गोरगरिबांचे घर उध्वस्त करून वरली मटक्यावर घर भरणारे लोक निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यांना धडा शिकवला पाहिजे... असे नितीन देशमुख यावेळी म्हणाले
प्रकाश आंबेडकर म्हणतात, "काँग्रेसवाले भूरटे चोर, तर भाजपवाले डाकू. ही शेवटची निवडणूक, यातच भाजपचे कंबरडे मोडा
अकोल्यातील सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर कठोर टिका करतांना काँग्रेसवरही शेलक्या शब्दांत हल्ला चढवलाय. काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा भूरटा चोर असल्याचं म्हटलंय. तर भाजपवाले हे मात्र डाकू असल्याचं म्हटलंय. भाजपवाले अख्खं दुकानच लुटून नेत असल्याचं म्हटलंय. त्यामूळे डाकूंच्या सत्तेला पूर्णविराम देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर हे वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोल्यातील शिवणी गावातील प्रचारसभेत बोलत होतेय.
बच्चू कडू म्हणतात, भाजपकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना मतदान करू नका
प्रहारचे नेते बच्चू कडू़ंनी अकोल्यातील आपल्या भाषणात भाजपवर चौफेर आणि शेलक्या शब्दांत टीका केलीये.. कडू यांनी भाजपला रावणाची उपमा दिलीये. भाजप म्हणजे नामर्दांची औलाद असल्याची कमरेखालची टिका त्यांनी यावेळी केलीय. यावेळी त्यांनी नवनीत आणि रवी राणांवरही टिका केलीय. हे दोघे नवरा-बायको वेगवेगळ्या पक्षांत आहेत. आता त्यांनी त्यांच्या मुलाला प्रहार पक्षात पाठवावं असा चिमटा घेतलाय. देवेंद्र फडणवीस आतापर्यंतचे सर्वात लबाड मुख्यमंत्री असल्याची बोचरी टिका केलीय. भाजपकडून पैसे घेतले तरी त्यांना मत मारू नका असं काहीसं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

