Ind Vs End : तिसऱ्या वनडेमधून 'या' ३ प्रमुख खेळाडूंना डच्चू? कोणाला मिळाली संधी? Playing 11

Ind Vs End 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात टॉस जिंकून इंग्लंडच्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ind Vs End 3rd ODI Playing 11
Ind Vs End 3rd ODI Playing 11Saam Tv
Published On

Ind Vs End 3rd ODI Playing 11 : भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सिरीजचा शेवटचा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताने टी-२० मालिकेनंतर वनडे मालिकेमध्येही विजय मिळवला आहे. आज या मालिकेतला शेवटचा सामना अहमदाबादमध्ये रंगणार आहे. रोहित शर्माने प्लेईंग ११ ची घोषणा केली आहे. भारतीय संघामध्ये तीन बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रोहित शर्माने आजच्या सामन्यातील प्लेईंग ११ ची घोषणा केली. तिसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली आहे. त्यामुळे संघामध्ये कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

टॉसच्या वेळी रोहित शर्माने वरुण चक्रवर्तीला दुखापत झाल्याची माहिती दिली. रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यामध्येही पहिल्यांदा फलंदाजी करण्याची माझी इच्छा होती. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये सर्वांनी चांगली कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीच्या पायाला दुखापत झाली आहे. तर शमी आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे.'

Ind Vs End 3rd ODI Playing 11
Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan: पहिल्या भेटीत गैरसमज, एकमेकांना वाटले गर्विष्ठ; स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह अन् संजना गणेशनचं कसं जुळलं?

भारताची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

इंग्लंडची प्लेईंग ११ -

जॉस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट , बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम बँटन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद

Ind Vs End 3rd ODI Playing 11
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात घातक गोलंदाजाची एन्ट्री, बुमराहला संघाबाहेर ठेवण्याचं कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com