jobless Saam Tv
देश विदेश

Unemployment : हावर्ड एमबीएलाही नोकरी मिळेना; उच्चशिक्षितांकडे कौशल्य नाही? रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? VIDEO

rising job crisis for highly educated youth : तुम्ही जर एमबीए करायचा विचार करत असाल तर जरा थांबा आणि ही बातमी पाहा...अमेरिकेतल्या हावर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातले एमबीएचे विद्यार्थी सद्या काय करत आहेत...त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

Tejal Nagre

उच्चशिक्षित तरुणांची संख्या जशी वाढतेय तसं बेरोजगारीचं प्रमाणही वाढत चालल्याचं दिसतंय. आता तर चक्क एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांनाही नोकरीसाठी वणवण भटकावं लागतंय. हे चित्र आहे जगात सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतल्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांबाबत.. अमेरिकेतील हार्वर्ड आणि स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटीतून उत्तीर्ण झालेल्या एमबीए विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याची धक्कादायक बाब वॉल स्ट्रीट जरनलच्या अहवालातून पुढे आलीय. गेल्या वर्षी एमबीए केलेल्या साधारण एक चतुर्थांश विद्यार्थी अजूनही नोकरीच्या शोधात आहेत...या अहवालात नक्की काय म्हटलंय पाहुयात.

एमबीए कराल तर बेरोजगार व्हाल ?

25 टक्के एमबीए विद्यार्थी अजूनही नोकरीच्या शोधात

2022 मध्ये उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या 10 %

2023 मध्ये उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या 20 %

अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगलने एमबीए भरती कमी केलीये.

कमी अपेक्षा ठेवणारे उमेदवार नोकरी मिळवण्यात यशस्वी

लाखो रुपये खर्च करून अनेक विद्यार्थी पदवी मिळवतात....त्यानंतर ते मोठ्या पगाराच्या अपेक्षेने पुन्हा लाखो रुपये खर्च करून एमबीए करतात...मात्र त्यानंतरचं चित्र वेगळंच असतं...दरम्यान अशा या उच्चशिक्षित बेरोजगारीची कारणे नक्की काय आहेत पाहुयात...

उच्चशिक्षित बेरोजगारीची कारणे

नोकरीसाठी अपेक्षित कौशल्यांचा अभाव

व्यावसायिक प्रशिक्षणाची कमतरता

व्यवहारज्ञानाचा अभाव

सुरुवातीलाच गडगंज पगाराची अपेक्षा

कुचकामी शिक्षणव्यवस्था

त्यामुळे बदलत्या परिस्थितीसोबत तुम्ही जुळवून घेतले नाही...स्वत:ला बदलले नाही तर तुम्हीह काळाच्या ओघात मागे पडणार हे निश्चित...त्यामुळे हवे ते शिक्षण घ्या....पण त्याला पुरक अशी सर्व कौशल्ये संपादित करणेही आता काळाची गरज बनलीये....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT