झारखंड, ता. १ सप्टेंबर २०२४
झारखंडमध्ये उत्पादन शुल्क विभागातील कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. याप्रकरणात गैरप्रकार असल्याचा गंभीर आरोप करत याप्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्पादन शुल्क विभागातील हवालदारांच्या भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू झाल्याचा दावा झारखंड भाजपने केला आहे. यामागे अधिकाऱ्यांचा गैरकारभार असल्याचा आरोप प्रदेश भाजपने केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी तसेच आश्रितांना नोकऱ्या देण्याची मागणी भाजपने केली आहे. त्याचवेळी शनिवारी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान काही उमेदवारांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, किती उमेदवारांचा मृत्यू झाला याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.
पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'झारखंड एक्साइज कॉन्स्टेबल स्पर्धा परीक्षा अंतर्गत शारीरिक चाचण्या रांची, गिरिडीह, हजारीबाग, पलामू, पूर्व सिंहभूम आणि साहेबगंज जिल्ह्यातील सात केंद्रांवर सुरू होत्या. सर्व केंद्रांवर वैद्यकीय पथके, औषधे, रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. दुर्दैवाने शारीरिक चाचणी दरम्यान काही केंद्रांवर काही उमेदवारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत.
त्याचवेळी झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी शारीरिक चाचणीदरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासोबतच त्यांनी मृतांच्या आश्रितांना भरपाई आणि नोकऱ्या देण्याची मागणी केली आहे. मरांडी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'उमेदवारांना मध्यरात्रीपासून रांगेत उभे केले जाते आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हात धावावे लागते. भरती केंद्रांवर आरोग्य सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था केलेली नाही. मृत तरुणांच्या आश्रितांना सरकारने तातडीने भरपाई आणि नोकऱ्या द्याव्यात. तसेच या गंभीर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.