उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने आपल्या मृत गर्लफ्रेंडच्या अंत्यसंस्काराच्यावेळी तिच्या मृतदेहासोबत लग्न केल्याची आश्चर्यकारक घटना घडली. एखाद्या चित्रपटात घडतं त्याप्रकारे ही घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थितीत असलेले सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. या तरुणाने प्रेमाची अमर कहाणी लिहिली. रविवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात ही घटना घडली. या तरुणाने गर्लफ्रेंडच्या मृतदेहासोबत वैदिक विधीनुसार लग्न केले. मंत्रांचे पठण सुरू असताना त्याठिकाणी रडण्याचा आवाज येत होता. हे पाहून सर्वजण उपस्थित रडत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महाराजगंज येथील निचलौल पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये घडली. याठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमाने संपूर्ण गाव भावनिक झाले. या तरुणाचे स्थानिक बाजारात दुकान आहे. त्याचे एका तरुणीवर खूप प्रेम होते. दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. परंतू नशिबाने काही वेगळेच ठरवले होते.
या तरुण-तरुणीच्या प्रेमाला सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला. पण दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की त्यांच्या कुटुंबीयांना ते मान्य करावे लागले. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती तेव्हा तरुणीने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच तरुणाला मोठा धक्का बसला. ही बातमी ऐकताच तो थेट तिच्या घरी गेला. त्याने तिच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितले की मी तिला माझी बायको बनवण्याचे वचन दिले होते. आता मी आपल्या वचनापासून मागे हटणार नाही.
या तरुणाने तरुणीच्या कुटुंबाकडे तिच्या मृतदेहाशी लग्न करण्याची परवानगी मागितली. तरुणाचे हे बोलणं ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. पण दोघांचे प्रेम पाहून तरुणीच्या कुटुंबीयांनी देखील रडत रडत सहमती दिली. अंतिम संस्कारांच्या तयारी दरम्यान या तरुणाने पुजाऱ्याला लग्न समारंभ करण्याची विनंती केली. पंडितजींनीही जड अंतःकरणाने मंत्रांचा जप सुरू केला. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडच्या भांगामध्ये कुंकू भरलं आणि शांतपणे सात फेरे मारून लग्न पूर्ण केले.
उत्तर प्रदेशमध्ये प्रथेप्रमाणे महिला लग्नामध्ये आनंदात गाणी गातात. पण या लग्नाच्यावेळी सर्व महिला जोरजोरात रडत रडत शोक व्यक्त करत होत्या. या तरुण-तरुणीच्या लग्नाची मिरवणूक निघणार होती. पण त्यापूर्वीच अनर्थ घडला आणि या प्रेमाचा भयंकर शेवट झाला. या लग्नाच्यावेळी सर्व उपस्थित लोकं रडत होते. गर्लफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर या तरुणाने चितेला पतीच्या हक्काने अग्नी दिला. या घटनेनंतर हा तरुण म्हणाला की, मी आयुष्यभर तिचा होता आणि अजूनही आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.