Shocking CCTV : लोकल समोरून येत होती, तितक्यात BMC कर्मचाऱ्याचा तोल गेला अन् रूळावर कोसळला, त्यानंतर...

Ambernath Station Mumbai Local Video : अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बीएमसी कर्मचारी सिद्धनाथ माने यांचा पाय घसरून ते रुळावर पडले. त्याचवेळी एमएसएफ जवान अमोल देवरे यांनी धाडस दाखवत त्यांचे प्राण वाचवले.
Ambernath Station Mumbai Local Video
MSF Jawan Amol Devre rescues BMC employee Siddhnath Mane from train tracks at Ambernath station. CCTV footage of the heroic act has gone viral, showcasing rare bravery and alertness.Saam TV News
Published On

अजय दुधाणे, अंबरनाथ प्रतिनिधी

CCTV footage of disabled man falling on train tracks : रेल्वे स्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक दिव्यांग व्यक्ती रेल्वे रुळावर पडून जखमी झाल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकावर घडली. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरम्यान या दिव्यांगाचे प्राण MSF जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले. MSF जवान अमोल देवरे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमोल याने दिव्यांग व्यक्तीला धाडसाने वाचवले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर BMC कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे 2 जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास अंबरनाथवरून कर्जत दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. याच वेळी स्थानकावर लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले, मात्र याचवेळी माने यांना स्थानकाचा अंदाज आला नाही. त्यांचा पाय घसरून ते थेट रेल्वे रुळावर कोसळले, या घटनेत माने गंभीर जखमी झाले.

Ambernath Station Mumbai Local Video
Pune Accident : ट्रकनं दोघांना चिरडलं, महिलेच्या अंगावरून चाक गेलं, पुण्यातील अपघाताचा भयंकर व्हिडिओ

दरम्यान रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले एमएसएफ जवान अमोल देवरे यांना घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वात पहिले लोकल थांबवत आपल्या जीवाची पर्वा न करता स्थानकावरून ट्रॅकवर उडी मारून दिव्यांगाचे प्राण वाचवले आहे. यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले असून माने याना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही सर्व चित्तथरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अमोल देवरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ambernath Station Mumbai Local Video
Pune : चाकण हादरलं! ७ जणांनी महिलेला किडनॅप केलं, खोलीत डांबून बलात्कार केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com