Pregnant Woman Injures Herself Saam Tv
देश विदेश

Shocking: प्रसुती कळा असह्य, महिलेने स्वत:चं पोट फाडलं, नंतर घडलं ते भयंकर

Pregnant Woman Injures Herself: प्रसुती वेदना सहन न झाल्याने गरदोर महिलेने भयंकर पाऊल उचलले. या महिलेने स्वत:चे पोट ब्लेडने फाडले. तिने बाळाला जन्म दिला. पण तिची प्रकृती चिंताजनक आहे.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशातील बहाइच जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली

  • प्रसुती वेदना सहन न झाल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले

  • महिलेने स्वत:चे पोट ब्लेडने फाडले

  • बाळ सुरक्षित असून महिलेची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेशच्या बहाइच जिल्ह्यात भयंकर घटना घडली. एका गरोदर महिलेने प्रसुती वेदना सहन न झाल्यामुळे स्वत:च ब्लेडने पोट फाडले. नंदवल गावात ३२ वर्षीय महिला एकटीच राहित होती. तिच्या नवऱ्याचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. घरात कुणी नसताना असह्य वेदना सहन न झाल्यामुळे तिने हे भयंकर पाऊल उचलले.

महिलेने प्रसुती वेदना सहन न झाल्याने ब्लेडने पोट फाडले. त्यामुळे तिच्या आतड्या पोटातून बाहेर आला. गंभीर अवस्थेत तिला लखनऊच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी या महिलेची डिलिव्हरी करण्यात आली. बाळाची प्रकृती चांगली आहे. पण महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

महिलेला आधीच पाच मुलं आहेत. प्रसुती वेदना इतक्या असह्य झाल्या की महिलेने स्वत:चे पोट फाडले. पोट फाडल्यानंतर ही महिला जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर तिच्या शेजारी राहणारी महिला मदतीसाठी धावून आली. पोट फाडल्यामुळे आतड्या बाहेर आल्या. रुग्णालयात नेल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. बाळ सुरक्षित आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला लखनऊच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

गावकऱ्यांनी सांगितले की, महिलेने वेळेवर मदत न मिळाल्याने आणि बाळंतपणाची भीती वाटत असल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. वेदना सहन न झाल्याने या महिलेने स्वत:च्या जीवाची परवा न करता पोट फाडले. बाळ सध्या सुरक्षित आहे तर आईवर उपचार सुरू आहेत. या घटनेची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासगी कार्यालयात तलाठ्यांचा दरबार, गावचं कार्यालय सोडून शहरात तलाठ्यांची दुकानदारी, 'साम इन्व्हेस्टीगेशन'मध्ये तलाठ्यांचा पर्दाफाश

DA Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ६३ टक्क्यांची वाढ होणार

कोर्टातील 'तारीख पे तारीख' बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना महत्त्वाचे निर्देश

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT