Villagers Hospitalised After Consuming Dog Meat Saam tv
देश विदेश

Shocking: कुत्र्याची हत्या, सशाचे मटण सांगून गावभर विकले; खाताच गावकऱ्यांची प्रकृती खालावली, तरुणाने असं का केलं?

Villagers Hospitalised After Consuming Dog Meat: बिहारमध्ये एका तरुणाने भयंकर कृत्य केले. या तरुणाने कुत्र्याची हत्या करून गावभर सशाचे मटण असल्याचे सांगून ते विकले. १००० रुपये प्रतिकिलो दराने त्याने हे मटण विकले आणि गावकऱ्यांनी खरेदी देखील केले.

Priya More

Summary -

  • दारू पिण्यासाठी पैसे मिळावे यासाठी तरुणाचे भयंकर कृत्य

  • कुत्र्याचे मटण सशाचे असल्याचे सांगून गावात विक्री

  • मटण खाल्ल्यानंतर अनेक गावकऱ्यांची प्रकृती बिघडली

  • आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

बिहारच्या मोतिहारीमध्ये एक घृणास्पद घटना घडली. दारुसाठी पैसे गोळा करण्यासाठी एका तरुणाने भयंकर कृत्य केले. या तरुणाने कुत्र्याला मारले आणि त्याचे मांस म्हणजेच मटण गावातील नागरिकांना विकले. हे सशाचे मटण असल्याचे त्याने गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवत ते खरेदी केले आणि खाल्ले. पण हे मटण खाल्ल्यानंतर गावकऱ्यांना प्रचंड त्रास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मधुबन ब्लॉकच्या गढिया बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गढिया या गावात घडली. मंगरू साहनी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण याच गावात राहतो. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी या तरुणाकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने एक भयंकर कट रचला. त्याने गावातील एका कुत्र्याची हत्या केली आणि त्याचे मटणाच्या आकाराचे तुकडे केले. सशाचे मास आणल्याचे सांगून त्याने गावात या मटणाची विक्री केली.

गावातील जवळपास १५ जणांनी सशाचे मास समजून हे मटण खरेदी केले आणि घरी जाऊन त्याचे कालवण बनवून खाल्ले. आरोपीने हे मटण एक हजार रुपये प्रति किलो दराने विकले आणि या पैशात तो दारू प्यायला. मटण खाल्ल्यानंतर अनेक गावकऱ्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. काहींच्या पोटात दुखू लागले. लहान मुलांची प्रकृती गंभीर झाली. अनेकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी अनेकांची प्रकृती बिघडल्यामुळे गावातील रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी गावात फिरून सर्वांना सांगत सुटला की मी तुम्हाला सशाचे नाही तर कुत्र्याचे मटण खायला दिले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तो पळून गेला. गावाजवळील एका शेतामध्ये गावकऱ्यांना कुत्र्याचे डोकं आणि पंजे आढळून आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल; कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

Maharashtra Live News Update: विक्रोळीध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू; उपचार नाकारल्याचा आरोप करत हॉस्पिटलला घेराव

गायिका अंजली भारतीला दणका; अमृता फडणवीसांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, राज्य महिला आयोगाकडून कारवाईसाठी पहिलं पाऊल

Anjali Bharati: अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अंजली भारती कोण आहे?

Dry Fruit Laddu Recipe: संध्याकाळी काम करताना लागलेल्या भूकेसाठी बनवा साखरे नसलेला टेस्टी आणि हेल्दी ड्राय फ्रूट लाडू

SCROLL FOR NEXT