Woman Harassed on Street Saam Tv News
देश विदेश

Shocking: बाजाराला जाणाऱ्या तरुणीची नराधमानं वाट अडवली; चुंबनानंतर घेतला ओठांचा चावा

Woman Harassed on Street: बंगळूरूच्या गोविंदपुरा भागात रेशन आणणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिच्यावर भररस्त्यावर अश्लील चाळे करत जबरदस्तीने चुंबन घेऊन ओठ चावले; आरोपी अटकेत.

Bhagyashree Kamble

भरदिवसा आणि भररस्त्यावर एका महिलेवर अश्लील चाळे करत जबरदस्तीने चुंबन घेण्याचा आणि ओठांवर चावा घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही संतापजनक घटना बंगळूरूच्या गोविंदपुरा भागात घडली. पीडित महिला रेशन आणण्यासाठी घराबाहेर पडली. आरोपीन महिलेचा पाठलाग केला. नंतर अश्लील वर्तन करत तिचे चुंबन घेतले. या प्रकरणी तक्रारीनुसार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित महिला किराणा दुकानात रेशन आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर आरोपी मोहम्मद मारूफ शरीफ यानं पाहिलं. त्यानं महिलाचा पाठलाग केला. भररस्त्यावर तिची वाट अडवली. तसेच अश्लील वर्तन करण्यास सुरूवात केली.

रस्त्याच्या मधोमध त्यानं महिलेशी जवळीक साधली आणि जबरदस्तीनं तिचे चुंबन घेतले. नंतर ओठांवर चावा घेतला. यानंतर महिलेनं घटनास्थळावरून पळ काढला. तिनं सगळी हकिकत आपल्या आईला सांगितली. आईनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच घटनेची माहिती देत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांना आरोपी सापडला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात मराठी भाषेचे स्टिकर मनसे काडून रिक्षावर लावण्याची मोहीम सुरू

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT