Rajasthan School Girl Death Saam Tv
देश विदेश

Shocking : शाळेत खेळताना ९ वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू; ४ महिन्यांपूर्वीच भावाचाही मृत्यू; VIDEO व्हायरल

Rajasthan School Girl Death: राजस्थानमध्ये ९ वर्षांच्या शाळकरी मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. शाळेच्या मैदानावर खेळताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • राजस्थान येथे शाळेत खेळताना ९ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू

  • चार महिन्यांपूर्वी तिच्या भावाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता

  • घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राजस्थानच्या नागौरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. ९ वर्षांच्या शाळकरी मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही मुलगी शाळेच्या मैदानामध्ये खेळत होती. धक्कादायक बाब म्हणजे ४ महिन्यांपूर्वी या मुलीच्या भावाचा देखील असाच मृत्यू झाला होता. ५ महिन्यांच्या आत सख्ख्या बहीण-भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यातील एका खासगी शाळेमध्ये ९ वर्षांच्या मुलीचा मत्यू झाला. दिव्या असं मृत मुलीचे नाव होते. ती पाचवीमध्ये शिकत होती. ही घटना २३ फेब्रुवारीला सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. शाळेमध्ये सकाळच्या प्रार्थनेला वेळ होता त्यामुळे मुलं मैदानात खेळत होते. त्याचवेळी दिव्या खेळता खेळचा चक्कर येऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दिव्या शाळेच्या मैदानावर आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असते. अचानक दिव्याला चक्कर येते आणि ती खाली पडते त्यामुळे एकच गोंधळ उडतो. दिव्याला तात्काळ शाळेतील शिक्षक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेतात. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दिव्याचा भाऊ अभिषेकचा अशाच पद्धतीने चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. ९ सप्टेंबर २०२५ ला अभिषेक घराजवळ खेळत होता. खेळताना तो चक्कर येऊन खाली पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषीत केले. सख्ख्या बहीण-भावाचा ४ महिन्यात असा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT