'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

Reel Star Tehsildar: आता बातमी आहे रिलस्टार तहसीलदाराची. एका महिला तहसीलदाराने आपल्या कार्यालयात जोरदार रिल केला. एखाद्या कलेक्टरलाही लाजवेल अशी चमकोगिरी या रिलमध्ये केली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. नेमकी कोण आहे ही तहसीलदार? रिलमध्ये नेमकं काय आहे? यावरचा हा रिपोर्ट.
PRATIKSHA TEJANKAR REEL ROW
Risod Tehsildar Pratiksha Tejankar cinematic reel controversysaam tv
Published On

शासकीय पदाचा आणि कार्यालयाचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करण्यास सक्त मनाई असताना, वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी चक्क तहसील कार्यालयातच 'प्रोफेशनल सिनेमॅटिक रील' शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 'लाईट, कॅमेरा आणि अॅक्शन'च्या थाटात तयार केलेल्या या रीलमुळे शासकीय नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचा आरोप तहसीलदार तेजनकरांवर होतोय. तसचं या 'रीलस्टार' तहसीलदारावर तात्काळ कडक शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबतचा नियम काय आहे? पाहूयात. ​शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं 28 जुलै 2025 रोजी स्पष्ट परिपत्रक जारी केलेय. परिपत्रकातील नियम १० नुसार, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर फोटो, रिल किंवा व्हिडिओ अपलोड करताना शासकीय पदनाम, लोगो, गणवेश तसेच शासकीय इमारत व वाहनांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.

PRATIKSHA TEJANKAR REEL ROW
मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

परिपत्रकातील नियम 8 आणि 9 मध्ये शासकीय कामाचे प्रदर्शन करताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना "स्वयंप्रशंसा" होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. तसचं ​या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979' अन्वये कडक शिस्तभंग कारवाईची तरतूद आहे.

मात्र, तेजनकर यांनी आपल्या रिलमध्ये "तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी" असा नावाचा फलक, शासकीय खुर्ची, राष्ट्रीय ध्वज आणि बोधचिन्ह स्पष्टपणे दाखवून नियमालाच केराची टोपली' दाखवलीये. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ, असं विधान वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलंय. शासकीय कार्यालयात नियम फक्त सामान्य नागरिक आणि छोट्या कर्मचाऱ्यांसाठीच असतात का संतप्त सवाल उपस्थित होतोय.

PRATIKSHA TEJANKAR REEL ROW
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; एकाच झटक्यात काढले ४ महत्त्वाचे GR

स्वतः कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या तहसीलदारानेच जर अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवले असतील, तर त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून प्रकरण दाबलं जाणार की कठोर कारवाई करण्यात येणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांचंच नव्हे तर सामान्यांचंही लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com