मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

why did Yashwant Killedar throw notebook at Ritu Tawde : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ९० पानी वह्या दिल्याचा आरोप करत मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी पालिका सभागृहात महापौरांच्या दिशेने वही भिरकावली. आता किल्लेदारांवर कारवाईची मागणी होत आहे.

Yashwant Killedar throws notebook towards Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबई महापालिका सभागृहात मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापौर रितू तावडे यांच्या दिशेने वही फेकल्याची घटना घडली. या प्रकारामुळं सभागृहात एकच गोंधळ उडाला. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ९० पानी वह्या दिल्याचा आरोप किल्लेदारांनी केला. तसेच महापौर तावडे यांच्या दिशेने वही भिरकावली. किल्लेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली आहे.

मुंबई महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. महापालिकेतील शाळांमध्ये वह्या वाटप आणि त्यात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांचा मुद्द्यावर बोलताना मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापौर तावडेंच्या दिशेने वही भिरकावली. यावरून सभागृहात गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. महापौरांवर वही फेकण्याची कृती योग्य नाही, असं सांगतानाच किल्लेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com