छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याने सुरू केलेल्या साईड बिझनेसमुळे अनेकांना धक्का बसला आहे. आरोपी कपलला एक दिवसासाठी आपली रूम भाड्यावर देत असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या रूमची झडती घेतली असता, त्याच्या खोलीतून पोलिसांना बॅट्री, सीम कार्ड, मुलींचे केस, वापरलेले कंडोम सापडले आहेत. तसेच रेल्वे अपघाताशी संबंधित कटिंग सापडले आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
कमल किशोर (ग्रेड-२ रेल्वे कर्मचारी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ओएलएक्सवर ओयोची जाहिरात दिली होती. ५०० रूपयांत भाड्याने फ्लॅट देत असल्याची जाहीरात त्याने दिली होती. कमल भिलाईमधील पॉश कॉलनी चौहान ग्रीन व्हॅलीमधील रहिवासी आहे. जाहीरात दिल्यानंतर अनेक अनोळखी लोक त्याच्या फ्लॅटवर यायचे. कॉलनीतील लोकांना संशय येऊ लागला.
एक युवक आणि युवती जाहीरातीवरून रूम बुक करून फ्लॅटवर गेले होते. तो तरूण झोमॅटोमध्ये काम करणारा असून, १६ वर्षांचा होता. त्यानंतर कमलने कपलला खोलीत डांबून ठेवलं. नंतर कपलने आरडाओरडा केला. आवाज ऐकून कॉलनीतील रहिवासी जमले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्मृती नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ छापा टाकत कमलला ताब्यात घेतलं आहे.
कमलच्या फ्लॅटमधून अनेक वस्तू सापडल्या असून, बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडल्याने परिसरातील नागरिकांच्या मनात अधिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात पोलीस प्रवक्ते पद्मश्री तंवर म्हणाल्या की, जप्त केलेल्या साहित्याची फॉरेन्सिक चाचणी केली जाईल, तसेच फ्लॅटमधील येणाऱ्यांचीही ओळख पटवली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.