देश विदेश

Crime News: धक्कादायक! संतापलेला नवरा सासरवाडीत गेला, बायको अन् मुलावर धाडधाड गोळ्या झाडल्या अन् पसार झाला

Delhi Crime News: दिल्लीतील दयालपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. पतीने वादातून पत्नी व मुलावर गोळीबार केला. दोघेही गंभीर जखमी असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस तपास करत आहेत.

Dhanshri Shintre

दिल्लीतील दयालपूर येथील मुंगा नगर परिसरात शनिवारी दुपारी कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. आपल्या पत्नीशी आणि सासरच्या मंडळींसोबत झालेल्या चर्चेदरम्यान संतापाच्या भरात एका व्यक्तीने पिस्तूल काढून पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेदरम्यान आपल्या आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलालाही गोळी लागली.

रिजवाना परवीन आणि तिचा मुलगा अरबाज यांना तातडीने शास्त्री पार्क येथील जग प्रवेश चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार रिझवानाच्या छातीत गोळी लागल्याने तिची प्रकृती गंभीर आहे, तर अरबाजच्या हाताला इजा झाली आहे.

पोलिस तपासात समोर आले आहे की, अब्दुल करीम आणि त्याची पत्नी रिझवाना यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. सततच्या भांडणांमुळे चार महिन्यांपूर्वी रिझवाना आपल्या मुलासह माहेरी राहायला गेली होती. ती दयालपूरच्या मुंगा नगर परिसरात आई-वडील आणि भावासोबत राहत होती. शनिवारी अब्दुल करीम आपल्या पत्नीच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी पोहोचला. तळमजल्यावर चर्चा सुरू असताना अचानक त्याने पिस्तूल काढून रिझवानाच्या छातीत गोळी झाडली. दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करताच तिचा मुलगा अरबाज आईच्या बचावासाठी पुढे आला आणि त्याला देखील गोळी लागली.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटना स्थळावरून पोलिसांना चार फाटलेल्या काडतुसांचे कवच सापडले. माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि एफएसएलची टीम घटनास्थळी पोहोचली. जिल्हा पोलिस उपायुक्त आशिष मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अब्दुल करीम फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission : आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; IAS, IPS सहित ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती

Asia Cup 2025 Final जिंकण्यासाठी 'त्याला' संधी द्याच, IND vs Pak सामन्याआधी दिग्गजाची मोठी मागणी

Nashik Rain: नाशिकमध्ये पावासाचा हाहाकार; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात कंटेनर वाहून गेला

Shocking: रुग्णालयात कुस्तीचा आखाडा! डॉक्टर आणि आशा वर्कर्सने एकमेकांना धू-धू धुतलं; VIDEO व्हायरल

Shahapur : शहापूर तालुक्यातील धरण ओव्हरफ्लो; मोठ्या प्रमाणात विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT