Social Media Influencer Died  Saam Tv
देश विदेश

Shocking: सुंदर दिसण्यासाठी 'फॉक्स आइज' सर्जरी केली, संसर्ग होऊन सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरचा मृत्यू

Social Media Influencer Died : कॉस्मेटिक सर्जरी केल्यामुळे एका सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरचा मृत्यू झाला. तिने फॉक्स आइज सर्जरी केली होती. या सर्जरीनंतर संसर्ग होऊन तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • ब्राझिलच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा कॉस्मेटिक सर्जरीनंतर मृत्यू

  • ‘फॉक्स आइज’ सर्जरीनंतर संसर्ग होऊन तिचा मृत्यू झाला

  • सर्जरीनंतर चेहऱ्यावर सूज आणि डोळ्याजवळ जखमा झाल्या

  • श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला कॉस्मेटिक सर्जरी करतात. पण कधी कधी अशा प्रकारच्या सर्जरी करणं अनेकांच्या जीवावर बेततं. ब्राझिलच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचा अशाच प्रकारच्या एका सर्जरीमुळे मृत्यू झाला आहे. फॉक्स आइज सर्जरीनंतर या तरुणीच्या चेहऱ्याला गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला आणि नंतर तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अदायर मेंडेस दुत्रा ज्युनिअर असं या मृत्यू झालेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचे नाव होते. ती सोशल मीडियावर ज्युनिअर दुत्रा या नावाने प्रसिद्ध होती. ती फॅशन आणि लाइफस्टाइलसंबंधित व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत होती. सोशल मीडयावर तिचा मोठा चाहतावर्ग होता. अदायर मेंडेस दुत्राच्या निधनाचे वृत्त कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

३ ऑक्टोबरला ज्युनिअर दुत्राचा मृत्यू झाला. तिने या वर्षाच्या सुरूवातीला फॉक्स आइज सर्जरी केली होती. या सर्जरीनंतर तिच्या चेहऱ्यावर सूज येऊ लागली आणि डोळ्याजवळ अनेक जखमा होऊ लागल्या. तिचा चेहरा इतका सुजला होता की तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. ज्युनिअर दुत्राने सर्जरीनंतर सोशल मीडिआवर अनेक व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून ती बरं होण्यासाठी कसा संघर्ष करतेय हे सांगत होती.

ज्युनिअर दुत्राने फर्नांडो गार्बी या सर्जनवर वैद्यकीय गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. तिने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. तिने स्थानिक माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ही सर्जरी केल्यानंतर मला खूप त्रास होत आहे. माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला रक्तवाहिनी फुटल्यासारखे वाटते. उजव्या बाजूला त्रास होत नाही. पण डाव्या बाजूला सतत वेदना होत आहेत.'

काही दिवसांपूर्वी ज्युनिअर दुत्राला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे तिला एका साओ पाउलो येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृ्त्यूचे वृत्त कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, फॉक्स आइज ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे. डोळे सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी ही सर्जरी केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT