University Professor Molest on Female Student Saam
देश विदेश

'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन् माझी हो..' प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, 'नको तिथे स्पर्श' करत लैंगिक अत्याचार

University Professor Molest on Female Student: बंगळुरूमधील खासगी विद्यापीठातील ४५ वर्षीय प्राध्यपकावर विद्यार्थिनीवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

  • बंगळुरूमधील धक्कादायक घटना.

  • ४५ वर्षीय प्राध्यापकाची विद्यार्थिनीवर वाईट नजर.

  • आरोपीला अटक नंतर सुटकाही झाली.

४५ वर्षीय प्राध्यापकाला १९ वर्षीय पदवीधर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना बंगळुरूमधील एका खासगी विद्यापीठातून उघडकीस आली आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडली असल्याची माहिती आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. नंतर जामिनीवरही सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थिनीने आरोप केला की, २५ सप्टेंबर रोजी प्राध्यपकाने तिला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. सुरूवातीला तिनं घरी येण्यास नकार दिला होता. परंतु, प्राध्यपकांनी वारंवार विनंती केल्यानंतर आणि आईला माहिती दिल्यानंतर तिनं घरी जेवण करण्यास होकार दिला.

प्राध्यपकाने तिच्या आईला सांगितले की, त्याची पत्नी आणि मुले घरी असतील. तुमची मुलगी घरी सुरक्षित असेल, असं त्यांनी सांगितलं. तरूणी जेव्हा अपार्टमेंटमध्ये गेली, तेव्हा प्राध्यपकाने घरी कुणीच नसल्याचं सांगितलं. 'पत्नी आणि मुले घरी नाहीत. पुढील महिन्यात परत येतील', असं प्राध्यपकाने सांगितले. तेव्हा विद्यार्थिनीने घरी येण्यास नकार दिला. तेव्हा प्राध्यपकाने तिला विश्वासात घेऊन, महत्वाच्या बाबींवर चर्चा करू, असे सांगितले.

तरूणी घरात गेल्यानंतर प्राध्यपाकांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तरूणीला खासगी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. तसेच, 'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर'असं प्राध्यपकाने तरूणीला सांगितले. ग्रेड वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवत त्यांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तसेच लैंगिक छळ केला. नंतर तरूणीला मैत्रिणीचा फोन आला. तिनं घरातून पळ काढला.

तरूणीनं धाडस करून टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. तसेच प्राध्यपकाविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी प्राध्यपकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, अटकेनंतर प्राध्यपकाला जामिनावर सोडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT