IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

IPS Officer Puran Kumars Death: हरियाणातील IPS अधिकारी यांनी घरातच आयुष्य संपवलं. पत्नीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ झाल्याचा केला गंभीर आरोप.
IPS Officer Puran Kumars Death
IPS Officer Puran Kumars DeathSaam
Published On
Summary
  • IPS अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं.

  • IAS पत्नीला वेगळाच संशय.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

हरियाणातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणात बरेच खुलासे उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, आता त्याच्या पत्नीनं मोठा खुलासा केला आहे. त्यांनी गंभीर आरोप केले असून, उच्चपद्धस्त अधिकाऱ्यांकडून छळ झाल्यामुळे पतीनं आयुष्य संपवलं असल्याचं सांगितलं.

वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार यांची पत्नी अमनीत पी. कुमार या आयएएस अधिकारी आहेत. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं बुधवारी दावा केला की, उच्चपद्धस्थ अधिकाऱ्यांकडून छळ झाल्यामुळेच पूरन यांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

IPS Officer Puran Kumars Death
८०च्या दशकात रॉयल एनफील्ड बुलेटची किंमत किती होती? जुनं बिल सोशल मीडियात व्हायरल

वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार हे २००९ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी होते. मंगळवारी ते चंदीगड येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. या प्रकऱणी अमनीत कुमार यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अमनीत कुमार यांनी चंदीगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसेच रोहतक पोलिसांकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरूद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०६ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही केली.

IPS Officer Puran Kumars Death
पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१६२८ कोटी रूपयांचं पॅकेज; नुकसान काय अन् किती रूपयांची मदत मिळणार? जाणून घ्या

८ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक खूलासे

सुत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वत: स्वाक्षरी केलेली सुसाईड नोट ठेवली आहे. त्यांनी त्यात आपल्या कारकिर्दीत आलेल्या अंसख्य समस्यांचा उल्लेख केला आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com