पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१६२८ कोटी रूपयांचं पॅकेज; नुकसान काय अन् किती रूपयांची मदत मिळणार? जाणून घ्या

Maharashtra Govt Steps In with Financial Relief: पिकं, घरं, जनावरं अन् विहिरीचं नुकसान. शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर.
mahayuti
Maharashtra Politics:Saam tv
Published On
Summary
  • राज्य सरकारकडून दिलासा

  • शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

  • कुणाला किती मिळणार?

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी कष्टानं उभे केलेले पीकं वाहून गेलंय. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. शेतकऱ्यांचे फक्त शेतीच नाही तर, घर आणि जनावरं देखील वाहून गेली आहेत. नुकसान झाल्यानंतर सत्ताधारीसह विरोधकही नुकसानग्रस्त भागात गेले होते. खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. विरोधक आणि शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली. तसेच ओला दुष्काळ करण्याचीही मागणी. याच पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी मदत जाहीर केली.

mahayuti
आदिवासी मुलींची विक्री, लग्नाचे आमिष दाखवून सौदा; ठाणे अन् पालघरमधील भयंकर प्रकार उघड

शेतकऱ्यांचं किती नुकसान?

  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान.

  • ग्रामिण भागातील घर, गोठे, जनावरांचे नुकसान.

  • शेतात चिखल. जमीन खरडून गेली. रब्बीची पेरणी करायची स्थिती राहिली नाही.

  • ६८ लाख ६९हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान.

  • राज्यात एक कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी ६९ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

mahayuti
सलमानला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं; पनवेलमध्ये गुन्हा करून फरार, आरोपीचे कल्याणमध्ये मुसक्या आवळल्या

राज्य सरकारकडून मदत

  • शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खास पॅकेज जाहीर.

  • तत्काळ मदत म्हणून १० हजार रुपये तसेच गहू तांदूळ देण्यात आले.

  • पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद.

  • डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत.

  • नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदतीची तरतूद.

  • NDRF चे निकष काही प्रमाणात काढून टाकले आहेत.

  • ४७ हजार एकरी खरवडून गेलेल्या जमिनींना मदत.

  • दुकानदार, गोठ्यांना, दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपयांपर्यंत प्रति जनावर, अशा प्रकारची मदत.

  • प्रति विहीर ३० हजार रुपये.

  • खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रूपये, तसेच नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी ३ लाख रूपये दिले जाणार.

  • रब्बी पिकासाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी ६१७५ कोटी.

  • विमा असलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार हेक्टरी मदत.

  • कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार तर बागायतीला ५० हजारपर्यंत मदत मिळेल.

  • पीकविमा किमान पाच हजार कोटी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com