Shimala Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking: कानाचा पडदा फाटेपर्यंत ८ वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण; पँटमध्ये विंचू टाकला अन्...; शाळेमध्ये शिक्षकांचं भयानक कृत्य

Shimala Crime News: शिमल्यातील शाळेमध्ये मुख्याध्यापकासह शिक्षकांनी ८ वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मुलाच्या कानाचा पडदा फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. तसंच त्याच्या पँटमध्ये विंचू देखील टाकला.

Priya More

Summary:

  • हिमाचल प्रदेशच्या शिमल्यातील शाळेमध्ये भयानक घटना

  • मुख्याध्यापकासह शिक्षकांकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

  • ८ वर्षीय विद्यार्थ्याला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारहाण

  • विद्यार्थ्याच्या पँटमध्ये विंचू सोडला

हिमाचल प्रदेशच्या शिमल्यामधील एका शाळेमध्ये भयंकर घटना घडली. शाळेच्या मुख्याध्यापक आणि ३ शिक्षकांनी ८ वर्षांच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. ऐवढ्यावर न थांबता या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पँटमध्ये विंचू देखील टाकला. पीडित विद्यार्थी जोरजोरात रडत होता तरी देखील शिक्षकांनी त्याचा छळ करणं थांबवले नाही. या घटनेमुळे शिमल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिमला जिल्ह्यातील रोहरू उपविभागातील खारापानी भागीतल एका सरकारी शाळेत ही भयंकर घटना घडली. पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकासह शिक्षकांनी बेदम मारहाण केली. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, मुख्याध्यापक देवेंद्र आणि शिक्षक बाबू राम आणि कृतिका ठाकूर यांनी त्यांच्या मुलाला जवळपास १ वर्षे मारहाण केली. सतत मारहाण केल्यामुळे मुलाच्या कानातून रक्त येऊ लागले आणि त्याच्या कानाचा पडदा फाटला.

या विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकांवर असा देखील आरोप केला आहे की, मुलाला शाळेच्या शौचालयात नेले आणि त्याच्या पँटमध्ये विंचू टाकला. विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापक आणि ३ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहितेच्या कलम १२७(२), ११५ (२), ३५१ (२), ३ (५) आणि बाल न्याय कायद्यांतर्गत मुलावर क्रूरतेचा गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी असा देखील आरोप केला आहे की, घरी जर कुणाला सांगितले तर तुला अटक केली जाईल अशी धमकी शिक्षकांनी दिली होती. ३० ऑक्टोबरला मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसंच जर हे बाहेर कुणाला काही सांगितले तर तुझ्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

'आम्ही तुला जाळून टाकू', अशी देखील धमकी शिक्षकांनी दिली होती. तसंच, मुलाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू नये किंवा सोशल मीडियावर पोस्ट करू नये यासाठी त्यांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिली. शाळेमध्ये नेपाळी आणि दलित विद्यार्थ्यांना वेगळं बसवलं जातं असा देखील आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्याचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT