उद्धव ठाकरे यांना मामा बनवून भाजपमध्ये सामील झालेले राजवाडे यांचे ग्रह अधिक फिरल्याचे दिसून येत आहे. आधीच गोळीबार प्रकरणी विसे मळा गोळीबार प्रकरणी कारागृहाची हवा खात असलेल्या बागूल टोळीचे आणखी एक कांड समोर आला आहे. जमीन व्यवहारात प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेत 57 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी तसेच जागा ताबा सोडण्यासाठी तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी संजय राठी, महेश राठी, अजय बागुल आणि मामा राजवाडे बाबासाहेब उर्फ भगवंत पाठकसह 20 जणांविरोधात म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आतापर्यंत नाव न ऐकलेला बाळसाहेब पाठकचे देखील कांड समोर आले आहे. या प्रकरणामुळे बागुल टोळीचे धाबे दणाणले आहे.
मूर्तिकार चंदन गोटिराम भोईर (वय, 40 रा. सरस्वतीनगर,रासबिहारी इंग्लिश मिडियम स्कूलरोड, के.के. वाघ अग्रिकल्चर कॉलेजशेजारी, कालिकामाता यज्ञ मंदिराजवळ धात्रक फाटा, 1 पंचवटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय राजाभाऊ राठी, महेश संजय राठी (रा. गंगापूर रोड) मामा राजवाडे, अजय बागुल, मीना लोळगे, प्रतीक लोळगे, प्रतिक लोळगेचा भाऊ, बाळासाहेब पाठक आणि इतर 10 ते 12 अनोळखी व्यक्ति यांच्याविरोधात खंडणी, मारहाण, कब्जा करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
भोईर परिवार मूर्तिकार असून, भगवान शंकर तसेच कालिमाता पूजक आहे. शहरातील अनेक लोकांच्या हे समस्या सोडवत असतात. आणि याच परिवाराच्या जमिनीवर राठी यांची नजर पडली आणि त्यानंतर त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू झाला. 16 मार्च ते ऑगस्ट 2025 दरम्यान हे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली वावरत होते.
पैसे जमवून 57 लाखांची खंडणी दिल्यानंतर जागेचा ताबा मिळवण्यासाठी दोन कोटींची मागणी झाल्याने ते हतबल झाले होते. तेव्हा म्हसरूळ पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु दिवाणी प्रकरण असल्याचे सांगून त्यांना परत पाठवून देण्यात आले होते. गोळीबार, पंजाब बारप्रकरणी यातील आरोपींना अटक होऊन कठोर कारवाई झाल्याने भोईर परिवाराला धीर आला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेत सविस्तर माहिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.