Meghalaya MP Ricky Andrew J. Syngkon 
देश विदेश

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Ricky Andrew J. Syngkon यांचे फुटबॉल खेळताना आकस्मिक निधन झाले. संपूर्ण मेघालय आणि शिलाँगमध्ये शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

मेघालयातील शलाँग मतदारसंघाचे खासदार आणि व्हीपीपी पार्टीचे जेष्ठ नेते रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचं दु:खद निधन झालेय. ते ५४ वर्षांचे होते. फुटबॉल खेळताना अचानक कोसळले अन् त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झाल्याची माहिती व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) च्या एका नेत्यानं दिली आहे. रिकी अँड्र्यू यांच्या निधनानंतर मेघालय आणि देशावर शोककळा पसरली आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे गुरूवारी सायंकाळी शिलाँगमधील मावलाई मविओंग भागात मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. सामना सुरू असतानाच अचानकच ते मैदानातच कोसळले अन् बेशुद्ध पडले. सिंगकॉन यांना तातडीने जवळच्या मविओंग कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी गुरूवारी रात्री ८:४५ वाजता त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालेला असेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मेघालयाच्या राजकारणातील मोठे नाव

रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे मेघालयाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. शिलाँगमध्ये त्यांचा राजकीय दबदबा होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रिकी सिंगकॉनने यांनी शिलाँगमधून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विन्सेंट पाला यांचा मोठ्या मतांनी पराभव करत पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला. रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे फक्त राजकारणीच नव्हते तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं मोठं काम होते. त्यांनी अनेकवर्षे प्राध्यापक म्हणून मुलांना घडवले आहे. साधेपणा आणि जनतेमध्ये तळागाळातील कामासाठी रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांना शिलाँगमध्ये ओळखले जात होते.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

खासदार रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने मेघालयात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सिंगकॉन यांच्या निधनावर दुख व्यक्त केले. ते म्हणाले, "खासदार रिकी सिंगकॉन यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. ते जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारे समर्पित लोकप्रतिनिधी होते. त्यांचे जाणे राज्याचे मोठे नुकसान आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT