rajya sabha seat candidate  Saam tv
देश विदेश

महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला? महत्वाची माहिती समोर

rajya sabha seat candidate : महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला आहे. महाविकास आघाडीकडून राज्यसभेची उमेदवारी शरद पवार यांना मिळण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती

महाराष्ट्रात ७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार

महायुतीला ६ जागा, तर महाविकास आघाडीला १ जागा जिंकण्याची शक्यता

देशासहित राज्यातील राजकीय पक्षांना राज्यसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत एक जागा जिंकण्याची संधी आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठण्याचे निश्चित झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये स्थानिक उमेदवारांना राज्यसभा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकच जागा जिंकण्याची संधी आहे. या जागेवर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली आहे.

राज्यसभेतील ७ जागांसाठी अर्ज करण्यासाठी ५ मार्च अंतिम तारीख आहे. तर निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. एप्रिल महिन्यात शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, रामदास आठवले, भागवत कराड, रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसने राज्यसभेच्या एका जागेवर दावा केल्याची चर्चा होती.परंतु आदित्य ठाकरे यांनी १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचे सांगितले.

ठाकरे गटाकडे २० आमदार आहेत. काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे १० आमदार आहेत. महायुती सातपैकी ६ जागा सहज जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजपकडून विजया रहाटकर आणि विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपच्या कोट्यातून पु्न्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार कोण असणार?

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT