चिंताजनक! महाराष्ट्रातील कराडचे २१ पर्यटक दुबईत अडकले; हॉटेलजवळच मोठा स्फोट, टेन्शन वाढलं

indian tourist stuck dubai : महाराष्ट्रातील कराडचे २१ पर्यटक दुबईत अडकल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या हॉटेलजवळच मोठा स्फोट झाल्याचे समोर आलं आहे.
karad news
indian tourist stuck dubai Saam tv
Published On

कराडचे २१ पर्यटक दुबईत अडकले आहेत

दुबईत हॉटेलजवळ स्फोट झाल्याची घटना घडलीये

दुबई फ्लाइट रद्द झाल्यामुळे पर्यटक अडकले आहेत

अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे जगात युद्धाचा भडका उडाला आहे. इस्त्रायलचे इराणवर क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत. या युद्धाचा भारताच्या हजारो नागरिकांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांना या घटनेचा फटका बसल्याचे दिसत आहे. युद्धादरम्यान इराणने दुबई-अबू धाबीवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे कराडसहित राज्यातील विविध भागातील नागरिक दुबईत अडकले आहेत.

साताऱ्यातील कराडच्या २१ जण दुबईत अडकले आहेत. त्यांच्या राहत असलेल्या हॉटेल शेजारी स्फोट झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सातारच्या कराडमधील विमा अधिकारी पी. व्ही. जाधव यांच्यासह सहलीला गेलेले विमा कंपनीतील २१ जण दुबईमध्ये अडकून पडले आहेत. २१ जण राहत असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. ते राहत असलेल्या हॉटेलच्या जवळच बॉम्ब ब्लास्ट झाल्याने त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे.

दुबईत अडकले चंद्रपूरचे विद्यार्थी

दुबईत चंद्रपुरातील विद्यार्थी देखील दुबईत अकडले आहेत. या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी केलीये. दुबईच्या जबेल पोर्ट भागात हे विद्यार्थी अडकलेत. आता युद्ध किती दिवस चालेल सांगता येत नाहीये. मिसाईल आणि स्फोटाच्या आवाजांनी सर्व दहशतीत आहेत, असेही त्यांनी म्हटलं आहे.

karad news
तालिबाननं घेतला एअरस्ट्राइकचा बदला; आता युद्ध भडकणार? VIDEO

दुबईमध्ये अडकले पिंपरी चिंचवडचे 40 पर्यटक

पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह चाळीस ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दुबईत अडकला आहे. सांगवीतील गायकवाड कुटुंबीयातील सहा सदस्यांचा समावेश आहे. दुबईत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरीतील हा ग्रुप भारतात परतू शकला नाहीये.

पर्यटनासाठी गेलेला ग्रुप भारतात 25 फेब्रुवारी रोजी परतणार होता. परंतु दुबईतून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आलीये. त्यामुळं हा ग्रुप विमानांची उड्डाणे सुरु होईपर्यंत दुबईत अडकून राहणार आहेत. ते सध्या सुरक्षितस्थळी असले, तरी दुबईवरील वाढते हल्ले पाहता, त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. केंद्र सरकारने विशेष विमानांची सोय करुन अडकलेल्या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

karad news
१ लाखांत घरी आणा ७ सीटर कार; मायलेज जबरदस्त, काय आहेत फिचर्स? वाचा सविस्तर

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत आडकला रायगडमधील उत्कर्ष

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील पाली येथील उत्कर्ष मपारा हा विद्यार्थी आडकलाय. त्याचे वडील राजेश मपारा यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्याशी संपर्क साधत परिस्थितीची चौकशी केली. सध्या तरी तो राही असलेल्या ठिकाण सुरक्षित असल्याचे उत्कर्ष याने सांगितले. त्याच्यासोबत दोनशे विद्यार्थी असल्याचे त्याने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com