तालिबाननं घेतला एअरस्ट्राइकचा बदला; आता युद्ध भडकणार? VIDEO

तालिबानने पाकिस्तानच्या एअरस्ट्राइकचा बदला घेत चोख प्रत्युत्तर दिलंय... पाक आणि तालिबानमधील हा संघर्ष नेमका का वाढलाय? तालिबानच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचा कसा थरकाप उडालाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
taliban and pakistan clash update
taliban and pakistan clashSaam tv
Published On

थरकाप उडवणारी तालिबाननं पाकिस्तानवर केलेल्या विध्वसंक हल्ल्याची दृश्य... याचं हल्ल्यानं तालिबाननं पाकिस्तानला पळता भुई थोडी केलीय.. तालिबाननं पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राइकचा बदला घेतलाय....त्यामुळे दोन्ही देशादरम्यान युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे... अफगाणिस्तानने मल्टी बॅरल रॉकेट लाँचरचा वापर करुन कुठे हल्ला केला पाहूयात...

तालिबानचा पाकिस्तानच्या कुनार प्रांतावर हल्ला

पाकिस्तानच्या 15 लष्करी चौक्या अफगाणिस्तानच्या ताब्यात

पाकचे F-16 लढाऊ विमान पाडलं

हल्ल्यात 40 पाकिस्तानी सैनिक ठार

मल्टी बॅरल रॉकेट लाँचरचा पाकविरोधात वापर

taliban and pakistan clash update
मुंबईच्या हवेचा 'कॅन्सर' रिपोर्ट; प्रदूषणामुळे मुंबईकरांना फुफ्फुसाचा कॅन्सर, VIDEO

खोस्त, पक्तिया आणि नुरिस्तान प्रांतातील सीमाभागात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननं हा हल्ला घडवून आणलाय... आधीच दहशतवाद्यांनी पोखरलेला पाकिस्तान आता अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धानं खिळखिळा होणार आहे... त्यात अफगाणिस्तानातील सत्तापालटानंतर पाकिस्तानला तालिबानी राजवट आपल्या बाजूनं झुकवून घेण्यात यश मिळालं नाही.

taliban and pakistan clash update
कल्याणमध्ये कुत्र्याने घेतला आणखी एक बळी; भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

एकीकडे आर्थिक संकट आणि दुसरीकडे भारताच्या कुरापती काढून स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्याची पाकची सवय आहे. आता अफगाणीस्तानसोबत युद्ध झाल्यास खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तानमधील अंतर्गत बंडखोरी आणखी उसळल्याचा धोका आहे. त्यामुळे पाकिस्तानची नवी शकलं पडणार हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com