Seema Haider Saam Tv
देश विदेश

Seema Haider News: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा होणार आई, स्वतःच शेअर केली गुड न्यूज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Seema Haider Became Mother:

पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेली सीमा हैदर नेहमी काही न काही कारणांनी चर्चेत असते. सीमा हैदर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीमा लवकरच पुन्हा एकदा आई होणार आहे. सीमाने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज दिली आहे. (Latest News)

२०२४ मध्ये सीमा सचिनच्या मुलाची आई होणार असल्याची माहिती दिली आहे. होळीनंतर त्यांच्या घरात लहान पाहुणा येणार असल्याचे तिने सांगितले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती सर्वांना दिली आहे. सीमा सचिन मीनाच्या बाळाची आई होणार आहे. यावर मात्र सीमाचा आधीचा नवरा गुलाम हैदर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

गुलाम हैदर हा सीमाचा आधीचा नवरा आहे. त्याने अनेकदा त्याच्या मुलांना परत पाठवण्याची मागणी केली आहे. गुलाम हैदरची मुले सीमासोबत भारतात राहत आहेत. त्यामुळे त्याने मुलांचा ताबा मागितला आहे. मंगळवारी युट्यूब लाईव्हमध्ये त्याने पुन्हा एकदा मुलांना परत पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. सीमा चांगली आई नाही, असेही त्याने युट्यूब लाईव्हमध्ये म्हटले आहे.

सीमा हैदर भारतासाठी एक समस्या बनू शकते. ती चुकीच्या पद्धतीने भारतात गेली आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात पाठवावे अशी मागणी गुलाम हैदरने सुरक्षा यंत्रणांकडे केली आहे. सीमाने बेकायदेशीरपणे माझ्या मुलांना सोबत नेले आहे. त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठवले पाहिजे, अशी मागणी त्याने केली आहे.

Edited By: Siddhi Hande

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT