turkey school firing  Saam tv
देश विदेश

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

turkey school firing : विद्यार्थ्यांने भर वर्गात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

तुर्कीत सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार

शाळेत झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ

तुर्कीच्या कहरमनमारस प्रांतातील माध्यमिक शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आयसर कालिक माध्यमिक शाळेत हा एका विद्यार्थाने गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सलग दुसऱ्या दिवशी तुर्कीत गोळीबाराची घटना घडली आहे.

गवर्नर मुकर्रम उनलुअर यांनी सांगितलं की, 'तु्र्कीच्या दक्षिण पूर्व प्रांतात बुधवारी कहराममारस शाळेजवळ एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली. चार लोकांचा मृत्यू झाला आहे. २० हून अधिक जण जखमी झाले आहेत'. उनलुअर यांनी सांगितलं की, 'मृतांमध्ये एका शिक्षकाचा देखील समावेश आहे. हल्ला करणारा विद्यार्थी होता. त्याने त्याच्या वडिलांच्या बंदुकीने शाळेत गोळीबार केला. त्याने बॅगेत बंदूक लपवून आणली होती. तर हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले'.

दक्षिण पूर्व तुर्कीतील एका शाळेत मंगळवारी गोळीबाराची घटना घडली. यात १६ लोक जखमी झाले. स्थानिक गवर्नर हसन शिलडक यांनी सांगितलं होतं की, 'गोळीबार करणाऱ्याचं वय १८-१९ वर्ष इतकं होतं. त्याने शॉटगनने अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर विद्यार्थ्याने स्वत:वरही गोळ्या झाडल्या. या गोळीबारात १० विद्यार्थी, ४ शिक्षक, एक कँटीन कर्मचारी आणि एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता.

तुर्कीतील ही घटना कोयंकु वोकेशनल अँड टेक्निकल एनाटोलियन शाळेत सकाळी ९.३० वाजता घडली होती. गोळीबारानंतर शाळा रिकामी करण्यात आली आहे. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं होतं. तर ५ जणांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यापक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी पोहे वरदान, फक्त टाका 'हे' २ पदार्थ

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज संकटात असतानाच महेंद्रसिंग धोनी घेणार मोठा निर्णय

Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

SCROLL FOR NEXT