शाळांना सुट्टी जाहीर
२५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुट्टी
१२ दिवस शाळा राहणार बंद
विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ख्रिसमसनिमित्त शाळा जवळपास १२ दिवस बंद असणार आहे. २५ डिसेंबरपासू ख्रिसमस सुरु होतो. त्यानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे. त्यानंतर थेट १० दिवसांनी म्हणजेच ५ जानेवारीला शाळा सुरु होणार आहे. थंडीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना आराम करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त सुट्ट्या (Christmas and New Year Holiday)
या सुट्ट्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त जाहीर करण्यात आल्या आहे. २५ ते १ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी असते. त्यानंतर विविध राज्यांमध्ये थंडीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये तर थंडीमुळे जवळपास दोन महिने सुट्टी जाहीर केली आहे. येथे तापमान खूप कमी असते. त्यामुळे रस्त्यावरदेखील बर्फ असतो.अशा परिस्थिती विद्यार्थ्यांच्या स्कूल बसने प्रवास करणे धोकादायक ठरु शकते. याचसोबत मुले आजारी पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जम्मू काश्मीरसह विविध राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शाळांना सुट्टी असते. त्या ठिकाणी माहिती दिली जाईल.
थंडीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची मज्जा
थंडीमुळे विद्यार्थ्यांना सकाळी उठायला जमत नाही. त्यामुळे सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची मज्जा होणार आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत अनेक गोष्टी करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.