School Fee Hike Saam Tv
देश विदेश

School Fee Hike: सांगा शिकायचं कसं? शाळेच्या फीमध्ये ८० टक्क्यांपर्यंत वाढ?

School Fee Hike from 50 to 80%: सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यात लहान मुलांच्या शाळांची फी वाढत आहे. शाळांची फी वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मात्र खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

देशातील शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील खाजगी शाळांच्या शुल्कामध्ये तब्बल 50 ते 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 300 हून अधिक जिल्ह्यांमधील 85 हजारांहून अधिक पालकांबरोबर संवाद साधण्यात आला.आणि त्यातून देशभरात खाजगी शाळा दरवर्षी 10-15 टक्के शुल्क वाढवत असल्याचं समोर आलं. तर महाराष्ट्रातही 44 टक्के पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शाळेच्या फी मध्ये 50 ते 80 टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगितलंय.

शाळा की लुटीचे कारखाने ?

  • गेल्या तीन वर्षांत शुल्कात 50 टक्क्यांहून अधिक वाढ, 42 टक्के पालकांची माहिती

  • 26 टक्के पालकांकडून 80 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढीची माहिती

  • अनेक खासगी शाळांकडून वाढीव शुल्कात बांधकाम, तंत्रज्ञान, देखभाल शुल्काचा समावेश

  • करोनानंतर शाळांकडून खाजगी वाहतूक, डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली अतिरिक्त पैशांची मागणी,पालकांचे आरोप

फी वाढीवर पालकांच्या प्रतिक्रिया

खाजगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची राज्यसरकारची घोषणा हवेतच विरल्याचं चित्र आहे.शाळांच्या वाढत्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहेत मात्र त्या नियमांनाही धडधडीतपणे केराची टोपली दाखवली जाते. तीन वर्षातली 80 टक्कयांची ही वाढ ही केवळ शालेय शिक्षणातली आहे.वेगवेगळ्या अभ्यासक्रमांनुसार ही फी वाढ बदलत असते.ही अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी कुणीच प्रतिबंध करत नसल्यानं खाजगी शाळा म्हणजे लुटीचे कारखाने बनले आहेत आणि त्याचा फटका मात्र सामान्यांना बसतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

SCROLL FOR NEXT