फी न भरल्याने मुख्याध्यापकाने पाचवीतल्या मुलाला शाळेतून काढलं, पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला शाळा सोडल्याचा दाखला

Nagpur : शाळेची फी भरण्यास विलंब केल्याने मुख्याध्यापकाने पाचवीत शिकणाऱ्या एका मुलाला आणि त्याच्या पालकांना त्रास देण्यात आला. मुलाचा निकाल रोखून ठेवून शाळा सोडल्याचा दाखला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवल्याचे मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे.
Nagpur News
Nagpur Newsx
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेची फी न भरल्याने एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने शाळेतून बाहेर काढले. पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या पालकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला पाठवला. मुख्याध्यापकाने पाचव्या वर्गाचा निकाल रोखून धरल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेत हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद असे पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. चौथ्या वर्गाची फी न भरल्याने मुख्याध्यापकाने माझ्या मुलाचा शाळा सोडल्याचा दावा दिल्याचे मोहम्मगचे वडील अब्दुल खकिल शेख यांनी म्हटले आहे. आम्ही पाचव्या वर्गाची फी सुद्धा भरली आहे. चौथ्या वर्गाची फी बाकी आहे. त्यामुळे सहाव्या वर्गात प्रवेश न देता शाळा सोडल्याचा दाखला पालकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचा दावा अब्दुल खकिल शेख यांनी केला आहे.

Nagpur News
Shocking : आधी मैत्री केली, नंतर वारंवार सामूहिक अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...; 'त्या' सहा जणांनी क्रूरतेचा कळसच गाठला

शाळेत आर टी अंतर्गत मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला होता, त्या संदर्भातल्या तक्रारी पालक म्हणून आम्ही शिक्षण विभागाकडे केली होती. याचा वचपा काढण्यासाठी मुलाला शाळा सोडल्याचा दाखला दिल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण, मुख्यमंत्री सचिवालय यांना इमेलद्वारे तक्रार करुन आम्ही न्याय देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती अब्दुल खकिल शेख यांनी केले आहे.

Nagpur News
Bhandara : धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वडील जाब विचारायला गेले अन् घडलं धक्कादायक कृत्य

शाळेची फी भरण्यास विलंब केल्याने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला शाळा सोडल्याचा दाखला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. निकाल रोखून आम्हाला त्रास दिला जात आहे असे मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे. शाळेच्या संदर्भात तक्रार केल्याने वचपा काढण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा दावा मुलाच्या वडिलांनी केला आहे.

Nagpur News
Kalyan News : कल्याण हादरलं! शौचालय बांधण्यावर वाद, शेजाऱ्यांकडून तरुणावर सपासप वार अन्... घटनेनं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com