Kalyan News : कल्याण हादरलं! शौचालय बांधण्यावर वाद, शेजाऱ्यांकडून तरुणावर सपासप वार अन्... घटनेनं खळबळ

Kalyan Shocking News : कल्याण पश्चिम येथील उंबर्डे परिसरात धक्कादायक घटना घडली. एका तरुणावर त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने तरुण हल्ल्यात बचावला.
Kalyan Shocking News
Kalyan Shocking Newsx
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याणमधील उंबर्डे येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या बाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून काही तरुणांनी शेजारी राहणाऱ्या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुण थोडक्यात बचावला. त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.

घराबाहेरच्या जागेत शौचालय बांधण्याच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. ज्या तरुणावर हल्ला झाला, त्याचे नाव विक्रांत जाधव असे आहे. शेजारी राहत असलेल्या तरुणांनी विक्रांतवर हल्ला केला असा आरोप विक्रांतच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Kalyan Shocking News
Qualifier 2 खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स बाहेर पडेल, पंजाबला होणार मोठा फायदा; कारण...

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे परिसरात विजय जाधव हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारी गायकवाड कुटुंब राहते. विजय जाधव ज्या जागी राहत आहेत, त्या घराच्या जागेवर गायकवाड कुटुंबाने दावा केला. या जागेवरुन जाधव आणि गायकवाड यांच्या मागील अनेक वर्षांपासून वाद सुरु आहेत. विजय जाधव यांनी घराच्या शेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरु केले. याला गायकवाड कुटुंबाने विरोध दर्शवला.

Kalyan Shocking News
Mumbai Indians साठी 'गुजरात' अनलकी, MI पलटनचं सहावी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगणार?

आठवडाभरापूर्वी शौचालय बांधण्याचे काम सुरु असताना गायकवाड कुटुंबाने काम मध्येच बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काम सुरु केल्यास जीवानिशी जाल अशी धमकी दिली. त्याशिवाय दोन लाख रुपयांची मागणी देखील केली अशी माहिती विजय जाधव यांनी पोलिसांनी दिली. आज सकाळी विजय यांचा मुलगा विक्रांत घराच्या शेजारी असलेल्या परिसरात पाणी आणण्यासाठी गेला. तेव्हा एकट्याला गाठत गायकवाड कुटुंबातील तरुणांनी विक्रांतवर तलवारीने हल्ला केला, अशी माहिती विजय जाधव यांनी दिली आहे.

Kalyan Shocking News
Jasprit Bumrah : मी तर चाल्लोय... महत्त्वाच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहचं धक्कादायक वक्तव्य, चाहत्यांचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com