bus Accident News saam tv
देश विदेश

Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस दरीत कोसळली, अनेक विद्यार्थी जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर मदतकार्य सुरू झाले.

साम टिव्ही ब्युरो

Bus Accident : उत्तर प्रदेशात शाळेच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बदायूंमधील कोतवाली बिसौली परिसरात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला आहे. शाळेची बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दरीत बस पडली.

या अपघातात 12 हून अधिक मुले जखमी झाली मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. बदाऊन ग्रामीण भागातील एसपींनी यासंदर्भात माहिती दिली आहे.  (Latest Marathi News)

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तेथे आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व स्थानिक नागरिकांनी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर मदतकार्य सुरू झाले. (Bus Accident)

बस अपघातानंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बिसौलीचे उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी झाले होते. बचाव आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. स्कूल बस चालकाची यामध्ये काही चूक आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. तपासात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT