Video: शाळेच्या बसचे स्टेअरिंग मद्यपीच्या हाती; नवी मुंबईतील उलवेमधील धक्कादायक घटना समोर

Navi Mumbai Latest News: दारुच्या नशेत विद्यार्थ्यांनी भरलेली बस एक चालवत असताना त्याने एका उभ्या रिक्षाला धडक दिली आणि हा गंभीर तसेच संतापजनक प्रकार समोर आला.
Drunk School Bus Driver In Ulwe
Drunk School Bus Driver In Ulweसिद्धेश म्हात्रे
Published On

सिद्धेश म्हात्रे, मुंबई

Navi Mumbai Today News: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या उलवेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. याचं कारण म्हणजे शाळेची बस चालवणारा ड्रायव्हर हा दारु पिऊन मद्यधुंद अवस्थेत होता. यामुळे त्याला बसचं स्टेअरिंगही त्याला नीट पकडता येत नव्हतं. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी भरलेली बस एक चालवत असताना त्याने एका उभ्या रिक्षाला धडक दिली आणि हा गंभीर तसेच संतापजनक प्रकार समोर आला. (Ulwe Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या उलवे मधील आयएमएस शाळेच्या स्कूल (IMS School, Navi Mumbai) बसमधील हा धक्कादायक प्रकार आहे. या स्कूल बसचा चालक सकाळी-सकाळी दारूच्या नशेत तल्लीन होऊन बस चालवत होता. उलवेमधील सेक्टर 21 मध्ये त्याच्या बसने वाटेत उभ्या असलेल्या एका रिक्षाला धडक दिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Drunk School Bus Driver In Ulwe
Pune Bandh: देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे; शाईफेकीच्या घटनेवरुन सुषमा अंधारेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप

यावेळी बसने रिक्षाला धडक दिली तेव्हा बसमध्ये अनेक शालेय विद्यार्थी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. धडक दिल्यानंतर जमलेल्या स्थानिक नागरिकांनी बस चालकाची चौकशी केली आणि व्हिडिओ (Video) शूट केला. यावेळी बस चालकाला बसचे स्टेअरिंगदेखील पकडण्याची शुद्ध नसल्याचे विडिओमधून स्पष्ट होतंय.  (Latest Marathi News)

यानंतर स्थानिक नागरिकांनी शालेय बस चालकाला पोलिसांच्या हवाली केलं. एवढी धक्कादायक घटना घडली असताना देखील या बस चालकावर किंवा शाळेच्या प्रशासनाविरोधात अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचं समोर येतंय. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव हा धोक्यात असून यावर कारवाई झाली नाही तर भविष्यात अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकरता येत नाही.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com