Spain Breaking News Saam tv
देश विदेश

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Spain Breaking News : स्पेनमध्ये विमानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्या.

Vishal Gangurde

स्पेनच्या पाल्मा डी मल्लोर्का विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाला शनिवारी अचानक आग लागली. विमानाला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रसानएअरच्या बोईंग ३३७ विमानात आग लागल्याची सूचना मिळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी विमानातून उड्या मारल्या. या दुर्घटनेत कमीत कमी १८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाला आग लागल्याची माहिती मिळताच इमरजेन्सी डिपार्टमेंटला माहिती देण्यात आली आहे. आग लागल्यानंतर बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आलं. विमानातील प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. आग लागल्याने काही प्रवासी विमानाच्या पंख्यावरून खाली उतरले. प्रवाशांनी विमानातून थेट जमिनीवर उड्या मारल्या.

विमानाला आग लागल्याने १८ प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमानाला आग लागल्याने प्रवासी घाबरले आहेत. काही प्रवासी विमानाच्या पंख्याच्या येथून जमिनीवर उड्या मारल्या.

विमान सेवा कंपनीने आग लागल्याचा घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच ४ जुलै रोजी पाल्माहून मॅनचेस्टरला जाणाऱ्या विमानाला आग लागली. आग लागल्याने विमानाचं टेकऑफ रोखण्यात आलं. विमान सेवा कंपनीने प्रवाशांना इन्फ्लेटेबल स्लाइडच्या मदतीने विमानातून उतरवलं. त्यानंतर प्रवाशांना विमानतळावर आणलं. या दुर्घटनेत एकूण १८ प्रवासी जखमी झाले. त्यातील ६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, विमानाला आग लागल्याने अनेक प्रवासांना प्रवास रखडला. त्यानंतर विमान सेवा कंपनीने त्यांना दुसऱ्या विमानाची सोय केली. या दुसऱ्या विमानाने प्रवाशांनी पुढील प्रवास केला. आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेतील जखमींच विमान सेवा कंपनीने माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT