
Raju Shetty on Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी असलेला शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा कणेरी मठावरून जोतिबाकडे जाणार आहे. या मार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसणार आहे. या मार्गामुळे हजारो एकर शेती उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बालिंगे येथील शक्तीपीठ महामार्गाच्या संभाव्य ठिकाणाहून दिली आहे.
आज राजू शेट्टी यांनी नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गातून दख्खनचा राजा जोतिबाकडे जाण्यासाठी राज्य सरकारने कणेरी ते जोतिबा हा नवीन मार्ग निर्माण केला जाणार आहे. या मार्गाच्या पूर परिस्थिती आणि होणारे नुकसानीची पाहणी करण्यासाठी बालिंगे ते दोनवडे याठिकाणी आले होते. या मार्गावर कणेरी नंदवाळ , बालिंगे , साबळेवाडी , शिंदेवाडी , नितवडे ते केर्लीवरून जोतिबापर्यंत हा मार्ग केला जाणार आहे.
कणेरी ते जोतिबा हा जवळपास २८ किलोमीटरचा भाग असून यामधील ७ किलोमीटरहून अधिक जमिनीवर जवळपास २० ते ४० फुटाचा भराव होणार आहे. राधानगरी , करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील भोगावती , कासारी तसेच पंचगंगा या नद्यांवरून हा शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरापासून ते भोगावती कारखाना , कुंभी कारखाना तसेच पन्हाळा तालुक्यातील शेकडो गावांना या भरावाच्या पुराचा फटका बसणार आहे.
पावसाळ्यात महिना-महिना पाणी शिवारात राहिल्याने भविष्यात परिसरातील जमीनी क्षारपड होणार आहेत यामुळे शेतक-यांचे अपरिमीत नुकसान होणार आहे. तीनही तालुक्यातील गावामध्ये अल्पभुधारक शेतकरी असून गोरगरीब लोकांना महापुरात महिना -महिना गाव सोडून स्थलांतरीत होणे अडचणीचे होणार आहे. यामुळे करवीर पन्हाळा व राधानगरी तालुक्यातील शेतक-यांनी या महामार्गास कडाडून विरोध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.