GODAVARI FAMILY DEATH CASE: saam tv
देश विदेश

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Five Family Members Jump Into Godavari: आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत इंजिनिअरसह कुटुंबीयांनी उडी मारल्याच्या प्रकरणात रायफल शूटिंग कोचला मेरठमधून अटक करण्यात आली. बहुराज्यीय शोधमोहीमेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत उडी मारून इंजिनीअर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात रायफल शूटिंग कोचला अटक करण्यात आली आहे. ही घटना 16 आणि 17 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. पंचायत राज विभगाचे सहाय्यक अभियंता थिल्लापुडी नकारजू, त्यांची पत्नी मीना, मुलगी सौजन्या आणि 10 वर्षांचा नातू यांनी राजमहेंद्रवरम येथील रोड-कम-रेल्वे पुलावरून गोदावरी नदीत उडी मारल्याचे सांगितले जाते. या घटनेत नुकाराजू आणि दोन्ही महिलांचा मृत्यू झाला, तर मच्छीमारांनी 10 वर्षीय मुलाला वाचवले.

तपासादरम्यान पोलिसांना नुकाराजू यांनी लिहिल्याचा संशय असलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत रायफल शूटिंग कोच शेख सादीक खान याचे नाव असून, कुटुंबाच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांशी त्याचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे, खानविरोधात नुकाराजूना विशिष्ठ धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे, खून आणि खंडणी यासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर बहुराज्यीय शोधमोहीम राबवत पोलिसांनी खानला उत्तर प्रदेशातील मेरठमधून अटक केली. काकीनाडा जिल्ह्याचे एसपी बिंदु माधव यांनी सांगितले की, पाच राज्यांमध्ये ही अत्यंत कठीण शोधमोहीम राबवण्यात आली असून दहापेक्षा अधिक पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. खान मोबाइल फोन आणि डिजिटल व्यवहार टाळत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. अखेर त्याच्या हालचालींचा मागोवा घेत त्याला अटक करण्यात आली. ट्रान्झिट वॉरंटवरून त्याला आंध्र प्रदेशात आणण्यात आले असून सध्या पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा नुकाराजू यांच्या कुटुंबाला सुमारे दोन वर्षांपासून ओळखत होता. तो त्यांच्या नातवाच्या शाळेत रायफल शूटिंग कोच म्हणून कार्यरत होता. त्यामुळे कुटुंबाशी त्याचे नेमके संबंध काय होते, घटनेनंतर त्याच्या हालचाली काय होत्या आणि चिठ्ठीत करण्यात आलेले आरोप कितपत खरे आहेत, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, माजी खासदार विजयसाय रेड्डी यांनी या प्रकरणाच्या सीबीआय किंवा एनआयएकडून चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणामागे मोठे षड्यंत्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात आतापर्यंत लव्ह जिहादशी कोणताही संबंध दिसून आलेला नाही. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, या मृत्यू प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT