Karnataka Congress Leader Death Case : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते डेव्हिड डिसोझा यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता, या हत्येमागचे धक्कादायक आणि संतापजनक कारण समोर आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस नेते डेव्हिड डिसोझा उडुपीमधून आपल्या वाहनातून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली. कोणतीही संधी न देता आरोपींनी त्यांच्यावर जवळून अंधाधुंद गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या डेविड डिसूजा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
संशयितांच्या चौकशीदरम्यान हा प्रकार जुन्या वैयक्तिक वादातून आणि आर्थिक देवाणघेवाणीतून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच यात कोणता मोठा राजकीय कट आहे का? या दिशेनेही पोलीस सध्या कसून तपास करत आहेत. या घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या धक्कादायक घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेत्याची हत्या ही सुपारी देऊन करण्यात आलेली होती. म्हणजेच पैशांसाठी त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादामुळे काँग्रेस नेत्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी राजू, अजय रस्तोगी आणि झियाउल वझूल शेख यांना अटक करण्यात आली. झियाउल हा बिहारचा, राजू उत्तर प्रदेशचा आणि अजय रस्तोगी उत्तराखंडचा आहे.
शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सेंट झेवियर्स चर्च परिसराजवळ ५५ वर्षीय काँग्रेस नेते डेव्हिड डिसोझा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. डिसोझा कार्यालयातून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन डोक्यात गोळी झाडली. गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेनंतर डिसोझा यांना तातडीने उडुपी येथील आदर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.