Republic Day 2024 Saam Tv
देश विदेश

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच महिला पोलिसांची तुकडी कर्तव्यपथावर कूच करणार

Republic Day 2024 Delhi : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत पोलिसांची महिला तुकडी परेडमध्ये सहभागी होणार आहे. संरक्षण दलाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Women Police Participate In Parade

यंदा दिल्लीत ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची (Republic Day 2024) जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडसाठी रंगीत तालीम सुरू आहे. कडक्याच्या थंडीत या सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संरक्षण दलातील दोन महिला तुकडी मार्च करणार आहेत. संरक्षण दलाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. (latest marathi news)

लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणं, हा याच्या पाठीमागे उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गर्ल कॅडेट्सचा सर्वाधिक सहभाग

महिला आयपीएस अधिकारी श्वेता के सुगाथन या दलाच्या १९४ महिला हेड कॉन्स्टेबल आणि मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करणार आहे. यासाठी दररोज कर्त्यव पथावर सराव सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महिला पहिल्यांदाच परेडमध्ये भाग घेत आहोत. यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत, असं विशेष पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलिस) रॉबिन हिबू यांनी म्हटलंय.

या एका तुकडीत सर्व महिला सैनिक असणार आहेत. ज्यात ६० लष्करातील आणि उर्वरित महिला या भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या अधिकारी असतील. दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राउंडवर एनसीसी प्रजासत्ताक दिन (Republic Day) शिबिर २०२४ मध्ये एकूण २,२७४ कॅडेट्स भाग घेणार आहेत. यावर्षीच्या शिबिरात एकूण ९०७ मुलींसह गर्ल कॅडेट्सचा सर्वाधिक सहभाग असणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना औपचारिकपणे आमंत्रित केलंय.

२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला. तेव्हापासून प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यात दिल्ली (Delhi) पोलिसांच्या मार्चिंग तुकडीचं वेगळेपण आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यांना आतापर्यंत १५ वेळा सर्वोत्कृष्ट कूच दल म्हणून घोषित करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT