Vinayak Raut News : Saam tv
देश विदेश

Vinayak Raut News : महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत; लोकसभेच्या निकालाआधीच विनायक राऊतांच्या विजयाचे बॅनर झळकले

ratnagiri sindhudurg lok sabha update :लोकसभेच्या निकालाआधीच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचे बॅनर दिल्लीत लागले आहेत. विनायक राऊत यांच्या विजयाचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण लागलं आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी जाहीर होणार आहे. या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. देशभरातील कोट्यवधी लोकांचं लक्ष लोकसभेच्या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या मतदारसंघात भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यात प्रमुख लढत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्याआधीच ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाचे बॅनर दिल्लीत झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाचे दिल्लीत लागले आहेत. ठाकरे गटाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निकालाआधीच विजयाचे बॅनर लावले आहेत. राजधानी दिल्लीतील महादेव रोडवर राऊतांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. विनायक राऊत यांना ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा,असं म्हणत युवासेनेकडून बॅनर लावले आहेत.

महाराष्ट्रात अनेक उमेदवारांचे बॅनर लागल्यानंतर राजधानी दिल्लीत देखील महाराष्ट्राच्या उमेदवारांचे विजयाचे बॅनर लागले आहेत. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार की नारायण राणे जिंकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी गणपतीपुळे येथे जाऊन दर्शन घेतले. या मतदारसंघात नारायण राणे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

साताऱ्यात निकालाच्या आधीच उदयनराजे यांचे झळकळले विजयाचे बॅनर

साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या मतदारसंघात मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. मात्र, याआधीच साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून आमचाच विजय होईल, अशा भावना व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT