Lok Sabha 2024 Results : लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, उमेदवारांची धाकधूक वाढली; थोड्याच वेळात मतमोजणी

Maharashtra Lok Sabha Election Result Latest Update : लोकसभा निवडणूक निकालांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आज मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, उमेदवारांची धाकधूक वाढली; थोड्याच वेळात मतमोजणी
Maharashtra Lok Sabha Election Result Latest UpdateSaam Tv

लोकसभा निवडणूक निकालांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आज मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. देशात नरेंद्र मोदी की राहुल गांधी कुणाची सत्ता येणार? याचा फैसला आज होईल. याशिवाय महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, याकडे देखील मतदारांच्या नजरा असतील.

लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, उमेदवारांची धाकधूक वाढली; थोड्याच वेळात मतमोजणी
IMD Rain Alert : निकालाच्या दिवशीच महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील अभुतपूर्व फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही नेत्यांना काँग्रेसची देखील चांगली साथ मिळाली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वातील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती, कोणत्या आघाडीला सर्वात जास्त जागा मिळणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान, निवडणूक निकालाआधीच अनेक संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला २६ ते २८ आणि महाविकास आघाडीला २० ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, आम्हाला याहून अधिक जागा मिळणार असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला जवळपास १० ते २० जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो, असा अंदाज देखील एक्झिट पोलने वर्तवला आहे.

२०१९ निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी तब्बल ४१ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५ आणि काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, उमेदवारांची धाकधूक वाढली; थोड्याच वेळात मतमोजणी
Lok Sabha Election 2024 Results Live : लोकसभा २०२४ निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com