Maharashtra Election 2024 Result Live: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी

INDIA VS NDA, Maharashtra Election 2024 Results Live Update in Marathi: महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निकाल आज जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती, कुणाला जास्त जागा मिळणार, याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live: बीडमधून भाजप उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर
Maharashtra Lok Sabha Election 2024 Results Live Updates on Winners, Big Fights, NDA VS INDIA, Constituency Wise Party Wise and State Wise ResultSaam TV
Published On

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली. एकूण ३० फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Beed Loksabha Election : बीडमध्ये भाजपला धक्का; पंकजा मुंडे यांचा पराभव

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. बजरंग सोनावणे यांनी त्यांचा ७ हजार मतांनी पराभव केला.

उद्या दिल्लीमध्ये एनडीएची बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार हजर

सत्ता स्थापनेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत.

फेरमतदान मोजणीत रवींद्र वायकरांचा ४८ मतांनी विजय

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा फेरबदल झालाय. रवींद्र वायकर ७५ मतांनी आघाडीवर

मतमोजणीवर अमोल किर्तीकर यांचा आक्षेप पडताळणीची मागणी केली आहे.

उत्तर पश्चिम मुंबईमध्ये फेरमतमोजणी सुरू

अमोल कीर्तिकर विजयी मात्र रवींद्र वायकर यांच्या मागणीनुसार रेकॉऊंटिंग सध्या सुरु आहे.

पोस्टलचं मतमोजणी आणि शेवटच्या टप्प्यातील मतांची मोजणी सध्या सुरु असल्याची माहिती

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 1,61,103 मतांनी विजयी

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 1,61,103 मतांनी विजयीा

नाशिक लोकसभेच्या शेवटच्या फेरीचे निकाल जाहीर

हेमंत गोडसे यांना 4,53,414 मतं

तर राजाभाऊ वाजे 6,14,517 मतं

शांतीगिरी महाराजांना मिळाली 44,415 मतं

मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा

मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल यांचा विजय झालाय. मात्र पियूष गोयल यांचं मताधिक्य एक लाखाने घटलं. गोयल यांना ३,५०,९२१ मते मिळाली आहेत. पीयूष गोयल यांना ६,६३,९६७ मतं तर भूषण पाटील यांना ३,१३,०४६ मतं मिळाली. २०१९ साली गोपाळ शेट्टी यांचा मुंबई उत्तर मधून ४,६५,२४८ मतांनी विजय झाला होता.

धुळे लोकसभा मतमोजणी दरम्यान नाट्यमय घडामोडी; मतमोजणी खोळंबली

भाजप उमेदवार सुभाष भामरे व काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या शर्यतीमध्ये धुळे लोकसभा मतदार संघातील पाच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला असल्याने मतमोजणी खोळंबली आहे. जवळपास हजार मताधिक्याने भाजपचे उमेदवार सुभाष भामरे विजयाच्या उंबरठ्यावर असताना, विजयाच अंतर कमी असल्याने दोघेही उमेदवार मतमोजणी केंद्रावर दाखल झालेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह या दोघाही उमेदवारांची चर्चा सुरू आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात चुरशीची लढाई

सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी. शरद पवार

414205 - आघाडी वर

कपिल पाटील. भाजप -

343567 - पिछाडी वर

निलेश सांबरे जिजाऊ अपक्ष

181769

भिवंडी लोकसभेतून सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

70638

मतांनी आघाडीवर

lok sabha nivadnuk nikal: सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल 

सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल दिसत आहे. त्यांनी मतांची आघाडी कायम राखली आहे. प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: जालन्यात कल्याण काळेंची ३१ हजार ९९२ मतांनी आघाडी, रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत

जालन्यात कल्याण काळेंची आघाडी दिसत आहे. रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत आहे. तर कल्याण काळे ३१ हजार, ९९२ मतांनी आघाडीवर आहेत. कल्याण काळे यांना आतापर्यंत ३०५७२८ मते मिळाली आहेत. तर रावसाहेब दानवे यांना २,७३,७३६ मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड 3 हजार मतांनी आघाडीवर

मुंबई उत्तर मध्यमधून पुन्हा एकदा वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. वर्षा गायकवाड यांना 3121 मतांची आघाडी मिळाली आहे. वर्षा गायकवाड यांना 4,06,036 तर उज्वल निकम यांना 4,02,915 मतं मिळाली आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: अहमदनगरमध्ये निलेश लंकेंची 16 हजार मतांनी आघाडी

अहमदनगरमध्ये निलेश लंकेंची 16 हजार मतांनी आघाडी आहे. तर सुजय विखे सोळाव्या फेरीत देखील पिछाडीवर आहेत. त्यामुळे लंकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: रत्नागिरीत २४ व्या फेरीत नारायण राणे आघाडीवर

रत्नागिरीत २४ व्या फेरीत नारायण राणे आघाडीवर दिसत आहे. नारायण राणे 51 हजार 894 मतांनी आघाडीवर आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते दणक्यात विजय साजरा करत आहेत.

lok sabha nivadnuk nikal: भिवंडी लोकसभेत शरद पवार गटाची आघाडी, सुरेश म्हात्रे 67,550 मतांनी पुढे

भिवंडी लोकसभेत शरद पवार गटाची आघाडी दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे 67,550 मतांनी पुढे आहेत. तर भाजपचे कपिल पाटील पिछाडीवर आहेत. त्यांना 2, 38,355 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरेंची विजयाकडे वाटलाच, 41643 मतांची आघाडी

छत्रपती संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरेंची विजयाकडे वाटलाच दिसत आहे. संदिपान भुमरे यांना (शिवसेना) हे 2,75,879 मतं मिळाली आहेत. इम्तियाज जलील (MIM) यांना 2,34,236 मतं मिळाली आहेत. तर चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT)यांना 1,74,766 मतं मिळाली आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: नारायण राणेंच्या विजयाचा मालवणात जल्लोष

नारायण राणेंच्या विजयाचा मालवणात जल्लोष दिसून येत आहे. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय; एक लाखापेक्षा अधिक मतांची आघाडी

हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाल्याचं दिसत आहे. एक लाखापेक्षा अधिक मतांची आघाडी आष्टीकर त्यांनी मिळवली आहे. हिंगोलीत महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: नागपूरात नितीन गडकरी 99,716 मतांनी आघाडीवर

नागपूरात नितीन गडकरी आघाडीवर दिसत आहे. गडकरी 99,716 मतांनी आघाडीवर आहेत. नितीन गडकरी यांना 4,80,762 मतं मिळाली आहेत. विकास ठाकरे यांना 3,81,046 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: बीडमध्ये महायुतीच्या विजयाची चिन्हे, पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर

बीडमध्ये महायुतीच्या विजयाची चिन्हे दिसत आहेत. पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर आहे. तर बजरंग सोनवणे यांना 446052 मतं मिळाली आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: मुंबई उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड आघाडीवर

मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे. ७९३ मतांनी वर्षा गायकवाड आघाडीवर दिसत आहे. मुंबई उत्तर मध्यमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: बारामतीत सुप्रिया सुळे विजयाच्या उंबरठ्यावर

बारामतीत सुप्रिया सुळे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. सुप्रिया सुळेंनी लाखाच्या मताधिक्याचा चप्पा ओलांडला आहे . १७ व्या फेरी अखेर सुळे यांनी १ लाख ८ हजार ४९० मतांचे लीड मिळवलं आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर यांचा जवळपास २००० मतांनी विजय

मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर यांचा जवळपास २००० मतांनी विजय झाल्याचं दिसत आहे. मात्र, रवींद्र वायकर यांच्याकडून पुनर्मतमोजणी करण्याची मागणी केली जात आहे. अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ विजयी 

पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. तर रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांचा विजय

रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांचा विजय झाला आहे. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. यावेळी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: शिर्डीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: सांगलीत विशाल पाटलांची विजयाकडे वाटचाल; 85 हजार 502 मतांची आघाडी

सांगलीत विशाल पाटलांची विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील 85 हजार 502 मतांनी आघाडीवर आहे. भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: जनतेचा हा विजय; अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

शिरूरमधून अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. तर आढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे. मोठी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. हा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया मविआचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई 53 हजार मतांनी पुढे, राहुल शेवाळे पिछाडीवर

दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई 53 हजार मतांनी पुढे आहेत. अनिल देसाई आघाडीवर तर राहुल शेवाळे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. अनिल देसाई यांना 3,95,138 मतं मिळाली आहेत. तर राहुल शेवाळे यांनी 3,41,754 मतं मिळाली आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: सोलापुरात ठाकरे गटाचा जल्लोष; मविआच्या यशाचं सेलिब्रेशन

सोलापुरात ठाकरे गटाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. राज्यात शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल सोलापुरात सेलिब्रेशन होत आहे. शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत ढोल - ताशांच्या गजारात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे आघाडीवर, मविआच्या विजयाची चिन्हे

दिंडोरी लोकसभेत मविआच्या विजयाची चिन्हे दिसत आहेत. दिंडोरीमधून मविआचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत. तर महायुतीच्या उमेदवार भारती पवार पराभवाच्या छायेत दिसत आहेत. मतमोजणीची 19वी फेरी सुरू आहे. डॉ. भारती पवार यांना 3 लाख 91,889 मतं आतापर्यंत मिळाली आहेत, तर भास्कर भगरे यांना 4लाख 72, 955 मतं मिळाली आहेत. भास्कर भगरे 81 हजार 068 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal : महाविकास आघाडीने जीवाभावाने काम केलं; शरद पवार

महाविकास आघाडीने जीवाभावाने काम केलं. आम्ही एकत्र आहोत. आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली आहे. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, देशातील चित्र आशादायक आहे. उत्तरप्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले. त्यांना काही जागा मिळाल्या असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ, शिवाजी काळगे विजयी, गुलाल उधळला

लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे हे विजयी झाले आहेत. तर जवळपास 60 हजाराच्या फरकाच्या मतांनी त्यांचा विजय झालाय. या विजयाचा जल्लोष आमदार धीरज देशमुख यांनी देखील साजरा केला आहे. महायुतीचे सुधाकर शृंगारे यांचा पराभव झाला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: परभणीत मविआचे बंडू जाधव यांची आघाडी, महादेव जानकर पराभवाच्या छायेत

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव आघाडीवर आहेत. त्याना 1 लाख 15 हजार मतांची आघाडी मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर पिछाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: मुंबई उत्तर मध्यची चुरस वाढली; उज्वल निकमांचं मताधिक्य घसरलं

उज्वल निकमांच्या मताधिक्यात सातत्याने घट होताना दिसत आहे. उज्वल निकम यांचे मताधिक्य ५३ हजारावरून पंधरा हजारांवर आले आहे. चौदाव्या फेरीच्या शेवटी उज्वल निकम यांना १५५५८ मतांची आघाडी दसत आहे. उज्वल निकम यांना ३,६७,१२५ मत तर वर्षा गायकवाड यांना ३, ६०,५६८ मतं आतापर्यंत मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.

lok sabha nivadnuk nikal: वर्ध्यात अमर काळे यांची विजयाकडे वाटचाल; अमर काळेंना 46628 मतांची आघाडी

वर्ध्यात अमर काळे यांची विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे. अमर काळे यांना 3,56,608 मते तर रामदास तडस यांना 3,09,980 मते मिळाली आहेत. 24 व्या फेरीअखेरही अमर काळे आघाडीवर आहेत. काळे देवळी विधानसभा मतदारसंघात 32953 मतांची आघाडी पाहायला मिळतेय.

lok sabha nivadnuk nikal 2024: नंदूरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

नंदूरबारमधून काँग्रेस उमेदवार पाडवी विजय झाले आहेत. विजयाचा विश्वास पहिल्या दिवसापासून आम्हाला होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. देशात बदल हवा होता. याची सुरुवात नंदुरबार पासून झाली आहे. देशात देखील आता काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा विश्वास नवीन खासदार गोवाल यांनी व्यक्त केलाय.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर, 63209 मतांनी पुढे

नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर दिसत आहेत. दहाव्या फेरीच्या मतमोजणीमध्ये नितीन गडकरी 63,209 मतांनी पुढे आहेत. नितीन गडकरी यांना 3, 63,139 मतं मिळाली आहेत. तर विकास ठाकरे यांना 2, 99,930 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष; प्रतिभा धानोरकर यांना सव्वा लाखाची आघाडी

चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा विजय दृष्टिपथात आला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. बाराव्या फेरीनंतर श्रीमती धानोरकर यांना सव्वा लाखाची आघाडी असल्याने समर्थक जल्लोष करू लागले आहेत. ढोल ताशे घेवून काँग्रेस समर्थक केंद्राबाहेर दाखल झाले आहेत. काँग्रेस जिंदाबादचे नारे देत आनंद व्यक्त करीत आहेत.

lok sabha nivadnuk nikal: मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल यांची २ लाखांवर आघाडी

मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल यांची २ लाखांवर आघाडी आहे. पियुष गोयल एकूण २ लाख ४ हजार ४९२ मतांनी आघाडीवर आहे. पियुष गोयल यांचा विजय निश्चित असल्याची चिन्हे दिसत आहेत. आज मतमोजणीच्या काही मोजक्या फेऱ्या बाकी आहेत. आतापर्यंत पियुष गोयल यांना ३,९१,२३१ मतं मिळाली आहेत. तर भूषण पाटील यांना १, ८६,७३९ मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर

मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणी श्रीरंग आप्पा बारणे यांना दीड लाखाच्या वर आघाडी मिळाली आहे.

lok sabha nivadnuk nikal: सोलापूरात प्रणिती शिंदे 26, 886 मतांनी आघाडीवर, भाजप पिछाडीवर

सोलापूरात प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. अकराव्या फेरीतील मतमोजणीमध्ये प्रणिती शिंदेंना 3,00,271 मतं मिळाली आहे. तर भाजप उमेदवार राम सातपुते यांना 2,73,385 मतं मिळाली आहे. प्रणिती शिंदे 26, 886 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal : अमरावतीत नवनीत राणा पुन्हा पिछाडीवर, बळवंत वानखडे यांची 31338 मतांची आघाडी

अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा पुन्हा पिछाडीवर पडल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे 31338 मतांनी आघाडीवर आहेत. बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 271246 मतं मिळाली आहेत. नवनीत राणा यांना आतापर्यंत 239908 मतं मिळाली आहेत. नवनीत राणा आणि बळवंत वानखडे यांच्यात मोठी चुरस पहायला मिळतं आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवाराला १ लाख ७२ हजार मतांची आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली मुसंडी मारल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. २६ व्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराला एक लाख ७२ हजार मतांचं लीड मिळालं आहे. अनपेक्षित असा निकाल लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून येत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: मोठी बातमी!, अकोल्यात भाजप उमेदवार अनूप धोत्रे यांची आघाडी, वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर

अकोल्यातून मोठी बातमी असून भाजप उमेदवार अनूप धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस उमेदवार अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाड़ीवर आहेत. 3781 मतांनी अनूप धोत्रे आघाडीवर आहेत. अनूप धोत्रे यांना 287912 मतं मिळाली आहेत. अभय पाटील यांना 284131 दुसऱ्या क्रमांची मते मिळाली आहेत तर प्रकाश आंबेडकर यांना 172509 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: यवतमाळ-वाशिममध्ये महाविकास आघाडी, संजय देशमुख यांना 53 हजार 116 मतांची लीड

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना 53 हजार 116 मतांची लीड मिळाली आहे. संजय देशमुख यांना 3 लाख 32 हजार 713 मत मिळाली असून राजश्री पाटील यांना 2 लाख 79 हजार 597 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: धुळ्यात चुरशीची लढत; काँग्रेस आणि भाजप उमेदवारामध्ये दीड हजारांचा फरक

धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा भाजपने बाजी पलटवली आहे. भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे दीड हजार मतांनी पुन्हा आघाडीवर आहेत. धुळे लोकसभा मतमोजणी दरम्यान काँग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर सुरू असल्याचं दिसतंय.

lok sabha nivadnuk nikal 2024: नंदुरबारमध्ये मविआची आघाडी, गोवल पाडवी यांना 1 लाख 64 मतांची लीड

नंदुरबारमध्ये मविआची आघाडी पाहायला मिळत आहे. महायुतीच्या उमेदवार हिना गावित या पिछाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी 22 व्या फेरीत 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर आहे.

बीड ब्रेकींग! बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर

बीडमध्ये मतमोजणीच्या १३ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे यांना ३,०३,५९२ मतं आतापर्यंत मिळाली आहेत. तर बजरंग सोनवणे यांना ३,१०,०६५ मतं मिळाली आहेत. बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal: कल्याण लोकसभेच्या 4 मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

कल्याण लोकसभेच्या चार मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. तीन विधानसभेच्या चार इव्हिएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. आकडेवारी दाखवत नसल्याने व्हीव्हीपॅड मधील मतपत्रिका मोजली जाणार आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: जालन्यात कल्याण काळे 5071 मतांनी आघाडीवर, रावसाहेब दानवे पिछाडीवर

जालन्यात कल्याण काळे 5071 मतांनी आघाडीवर आहेत. तर रावसाहेब दानवे पिछाडीवर दिसत आहे. आतापर्यंत कल्याण काळेंना 1,58,695 मतं मिळाली आहेत, तर रावसाहेब दानवे यांना 1,53,624 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: हिंगोली ब्रेकिंग! मविआचे उमेदवार नागेश पाटील 54 हजार मतांनी आघाडीवर

हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना 54 हजार मतांची लीड मिळाली आहे. तर महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर पराभवाच्या छायेत दिसत आहेत. मविआचे उमेदवार नागेश पाटील 54 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढले

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढण्यात आले आहेत. कारण बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढले आहेत.

lok sabha nivadnuk nikal: अहमदनगर ब्रेकिंग! निलेश लंके 9967 मतांनी आघाडीवर

दहाव्या फेरी अखेर निलेश लंके हे 9967 मतांनी आघाडीवर आले आहेत. गेल्या 8 फेऱ्यात आघाडीवर असलेले भाजपाचे सुजय विखे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगरमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

lok sabha nivadnuk nikal: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. उमेदवार प्रतिनिधींना धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. जेवणाची व्यवस्था नसल्यानं निवडणूक प्रतिनिधी जेवणासाठी बाहेर जात होते. तेव्हा पोलिसांनी अरेरावी करत धक्काबुक्की केली आहे. मतमोजणी केंद्रांच्या प्रवेशद्वारावर काही काळ प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला आहे .

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: ब्रेकिंग! सुप्रिया सुळेंची ५० हजारांची आघाडी

सुप्रिया सुळेंचं मताधिक्य ५० हजारांच्या घरात गेल्याचं समोर आलं आहे. १० व्या फेरी अखेर ४८३६५ मतांचे मताधिक्य आहे. सुळेंचा विजयाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: दक्षिण मुंबई अकराव्या फेरीनंतर अरविंद सावंत आघाडीवर

दक्षिण मुंबई अकराव्या फेरीनंतर अरविंद सावंत आघाडीवर आहेत. मविआचे उमेदवार अरविंद सावंत 49,467 मतांनी आघाडीवर आहेत. अरविंद सावंत यांना 1,64,516 मतं मिळाली आहेत, तर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना 1,15,049 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: ठाण्यात नरेश म्हस्केंना १ लाखाचा लीड, राजन विचारे पिछाडीवर

ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के यांनी एक लाखाचा लीड मिळवला आहे. त्यांनी अजून देखील प्रतीक्षा असल्याचे म्हस्के यांनी सांगितलं आहे. तर राजन विचारे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: सांगली ब्रेकिंग! विशाल पाटील समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

सांगली लोकसभेसाठी अत्यंत चुरशीने मतमोजणी होत आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. विशाल पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर काँग्रेस भवन समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. वसंतदादा भवनासमोर मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती.

सदरच्या स्क्रीनवर मतमोजणीबाबत माहिती देण्यात येत होती. मात्र, अज्ञातांनी चुकीची माहिती देत असल्याची तक्रार केली. यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे स्वतः त्याठिकाणी गेले. स्क्रीन बंद करण्यास सांगितली. यावेळी विशाल पाटील समर्थक आणि पोलिसांमध्ये काहीवेळ वादावादी झाली. यानंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाद निवळला.

lok sabha nivadnuk nikal 2024: गडचिरोली-चिमूर लोकसभेत काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर

गडचिरोली-चिमूर लोकसभेत काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर असल्याचं दिसत आहे. अशोक नेते (भाजप)यांना 1,36,242 मतं मिळाली आहेत. तर नामदेव किरसान (काँग्रेस) यांना 1,60,103 मतं मिळाली आहे. काँग्रेसचे नामदेव किरसान 23871 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024:  नरेंद्र मोदींचा करिष्मा मुंबईत फेल?

मुंबई उत्तर-पूर्व आणि मुंबई दक्षिण-मध्य या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात मोदींनी रोड शो केला होता. तर दक्षिण-मध्य मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. मुंबई उत्तर-पूर्वमधून मिहीर कोटेच्या पिछाडीवर तर दक्षिण-मध्यमधून राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आघाडीवर, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. बुलढाणा लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी 15641 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या 16 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. या 16 फेऱ्यांमध्ये प्रतापराव जाधव यांनी 15648 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर पेढे वाटत जल्लोष साजरा केला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची आघाडी

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना 1, 49,768 मतं मिळाली आहेत. तर भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांना 1, 48,303 मतं मिळाली आहेत. प्रशांत पडोळे 1465 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: अमरावती ब्रेकिंग! भाजप उमेदवार नवनीत राणा 9442 मतांनी आघाडीवर

अमरावतीमध्ये बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 1,30,169 मतं मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना आतापर्यंत 1,39,611 मतं मिळाली आहेत. अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा आणि मविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: जळगावमध्ये सहावी फेरी पूर्ण; स्मिता वाघ 86 हजार 381 मतांनी आघाडीवर

जळगावमध्ये मतमोजणीची सहावी फेरी पूर्ण झाली आहे. स्मिता वाघ यांची 86 हजार 381 मतांची आघाडी दिसत आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना 1 लाख 79 हजार 43 मतं मिळाली आहेत, तर करण पवार यांना 92 हजार 662 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: बीडमध्ये चौथ्या फेरीनंतर भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर

बीडमध्ये चौथ्या फेरीनंतर भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर दिसत आहेत. बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 1,22939 मतं मिळाले आहेत. नवनीत राणा यांना आतापर्यंत 1,35550 मतं मिळाले आहेत. नवनीत राणा यांची 12611 मतांची आघाडी दिसत आहे.

ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची सागर बंगल्यावर बैठक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांची सागर बंगल्यावर बैठक पार पडत आहे. राज्यातील आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. सध्या वेट ऑन वॉचची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. शेवटच्या टप्प्यात आकडे वाढतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

lok sabha nivadnuk nikal: कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष; शाहू महाराजांची आघाडी

कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. शाहू महाराज छत्रपती यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरकर न्यू पॅलेसवर दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांची आघाडी दिसत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर बारामतीत सुप्रिया सुळेंची आघाडी

पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत त्यांना एकूण 2,03,000 मतं मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर यांना 1,63,000 मतं मिळाली आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुप्रिया सुळे यांना 1,77,000 मतं मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना 1,66,000 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांची १ लाखाची आघाडी, सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर

काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी नवव्या फेरीत एक लाखाची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत पाच फेऱ्यांचे आकडे जाहीर झाले आहेत. भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचं दिसत आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: नाशिककरांनी निष्ठेचा फळ दिलं; राजाभाऊ वाजेंच्या मुलीची प्रतिक्रिया 

नाशिक लोकसभेत मतमोजणीच्या 14 व्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे हे 1,47,012 मतांनी आघाडीवर आहेत. ही राजाभाऊ वाजे यांची निर्णायक आघाडी आहे. त्यामुळे नाशिककरांनी निष्ठेचा फळ दिल्याचं राजाभाऊ वाजे यांची कन्या मानसी वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: सांगली ब्रेकिंग! विशाल पाटलांची 50 हजार 30 मतांनी आघाडी

सांगली लोकसभा मतमोजणीच्या अकराव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 50 हजार 30 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; राजाभाऊ वाजेंनी निर्णायक मतांची आघाडी

महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांनी निर्णायक मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: वर्ध्यात अमर काळे आघाडीवर, तर रामदास तडस पिछाडीवर

वर्ध्यामध्ये अमर काळे 24390 मतांनी आघाडीवर आहेत. अमर काळे यांना 215219 मते तर रामदास तडस यांना 190829 मते आतापर्यंत मिळाली आहेत. अमर काळे यांची आघाडी कायम असल्याचं दिसत आहे. काळे यांना सर्वाधिक देवळी विधानसभेतून आघाडी मिळाल्याचं दिसत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: मोठी बातमी! कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १ लाख १८ हजार ४१६ मतांनी आघाडीवर

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १ लाख १८ हजार ४१६ मतांनी आघाडीवर आहेत. आठव्या फेरीतील मतमोजणी पार पडली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ३३ हजार ७३४ मतं मिळाली आहेत, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना १ लाख १५ हजार ३१८ मतं मिळाली आहेत. शिवसेना श्रीकांत शिंदे यांना १ लाख १८ हजार ४१६ मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अत्यल्प मतदान

वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? हा प्रश्न आता निर्माण होत आहे. अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान झाल्याचं चित्र आहे. मुंबई उत्तरमधून वंचितला 1429 मतं, मुंबई उत्तर मध्यमधून 3600 मतं, मुंबई उत्तर पूर्वमधून 2665, उत्तर पश्चिममधून 5962 मतं, मुंबई दक्षिणमधून केवळ 994 मतं, दक्षिण मध्य मुंबईतून 7342 मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

धाराशिव येथील मतमोजणी केंद्रांबाहेर ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असल्याचं दिसत आहे. ओमराजे निंबाळकरांना सहाव्या फेरीअखेर 77 हजार 907 मतांची आघाडी मिळाली आहे. गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे 25 हजार मतांनी आघाडीवर

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आघाडीवर आहे. भाजपच्या रक्षा खडसे या 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत. रक्षा खडसे यांना 72 हजार 351 तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना 46 हजार 635 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: मावळमध्ये श्रीरंग बारणे 44,689 मतांनी आघाडीवर

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार 44,689 मतांनी आघाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना 220016 मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना 175327 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: रायगडमध्ये सुनील तटकरे यांची विजयाकडे वाटचाल, समर्थकांचा जल्लोष सुरु

रायगडमध्ये सुनील तटकरे यांची विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे. 10 व्या फेरी अखेर 39 हजार मतांची मोठी आघाडी आहे. सुनील तटकरे यांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू आहे. फटाके वाजवून जोरदार घोषणा देत तटकरे समर्थक जल्लोष करत आहेत.

lok sabha nivadnuk nikal:  सुप्रिया सुळे यांची ७ व्या फेरीअखेरीस आघाडी कायम

बारामतीत सुप्रिया सुळे यांची ७ व्या फेरीअखेरीस आघाडी कायम दिसत आहे. २५,३७५ मतांची आघाडी पाहायला मिळतेय. ७ व्या फेरीत आघाडी कमी झाल्याचं चित्र आहे. फक्त सातव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ७२९ मतांची आघाडी दिसत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरशीची लढत, संदिपान भुमरे 5122 मतांनी आघाडीवर

छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदिपान भुमरे 5122 मतांनी आघाडीवर आहेत. संदिपान भुमरे यांना 80135, इम्तियाज जलील (MIM) यांना 75013 तर चंद्रकांत खैरे यांना 53291 मतं आतापर्यंत मिळाली आहेत. संदिपान भुमरे हे 5122 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: नागपूरमध्ये नितीन गडकरी तर नाशिकमध्ये राजेभाऊ वाजे आघाडीवर

नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना 1 लाख 16 हजार 600 मतं मिळाली आहेत. तर विकास ठाकरे यांना 84 हजार 20 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीअखेर नितिन गडकरी 32 हजार 580 मतांनी आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 81,425 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: बुलढाण्यात महायुतीचे प्रतापराव जाधव आघाडीवर

बुलढाण्यात महायुतीचे प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत. प्रतापराव जाधव हे 14497 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय. तर महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर ( उबाठा ) पिछाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: नगरमध्ये सुजय विखे, तर जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर

नगरमध्ये सुजय विखे 10500 मतांनी आघाडीवर आहेत. तर निलेश लंके पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. जळगावमध्ये मतमोजणीच्या चौथी फेरीत भाजपच्या स्मिता वाघ 54 हजार 58 मतांनी आघाडीवर आहेच. स्मिता वाघ यांना लाख 18 हजार 615 मते, तर ठाकरे गटाचे करन पवार यांना 64 हजार 557 मते मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: मुंबई उत्तरमध्ये पीयूष गोयल आघाडीवर

मुंबई उत्तरमध्ये पीयूष गोयल 65704 मतांनी आघाडीवर आहेत. तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रविंद्र वायकर 5775 मतांनी आघाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात 34974 मतांनी उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: अकोल्यात मविआचे उमेदवार अभय पाटील यांची आघाडी

अकोल्यात काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांची आघाडी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप उमेदवार अनूप धोत्रे आणि वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. 5693 मतांनी अभय पाटील आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal: नाशिकमध्ये आठव्या फेरीत राजाभाऊ वाजेंची आघाडी, हेमंत गोडसे पिछाडीवर

नाशिकमध्ये आठव्या फेरीत राजाभाऊ वाजे यांची 71,332 मतांची आघाडी दिसत आहेत. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पिछाडीवर आहे. राजाभाऊ वाजे यांची 71,332 मतांची आघाडी आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: दक्षिण मुंबईत अरविंद सावंत 20, 042 मतांनी आघाडीवर

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांना 68434 मतं मिळाली आहेत. यामिनी जाधव यांना 48392 मतं मिळाली आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत 20, 042 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: शिरूर मतमोजणी केंद्रावर अमोल कोल्हे यांच्या विजयाची मिरवणूक, कार्यकर्त्यांचा जल्लोष

शिरूर मतमोजणी केंद्रावर अमोल कोल्हे यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली आहे. कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal: सातव्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांची 65,000 मतांची आघाडी

नाशिकमध्ये सातव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांची ६५००० मतांची आघाडी पाहायला मिळतेय. ते ६५ हजारांना पुढे आहेत. हेमंत गोडसे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.

lok sabha nivadnuk nikal 2024: नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी आघाडीवर

नंदुरबारमध्ये चौथ्या फेरीत काँग्रेसचे गोवाल पाडवी आघाडीवर आहेत. 69 हजार 214 मतांनी काँग्रेसचे गोवाल पाडवी आघाडीवर आहेत. गोवाल पाडवी यांना 1 लाख 43 हजार 916 मतं मिळाली आहेत. भाजपच्या हिना गावित यांना 74 हजार 702 मतं मिळाली आहेत .

lok sabha nivadnuk nikal: अमरावतीत बळवंत वानखेडे आघाडीवर; राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण सुरू

अमरावतीत बळवंत वानखेडे आघाडीवर आहेत. अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि पती आमदार रवी राणा हनुमान गडी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी हनुमानजींच्या निर्मानाधीन पुतळ्याची पूजा अर्चना केली आहे. याच परिसरात हनुमान चालीसा पाठ त्यांनी सुरू केलंय.

lok sabha nivadnuk nikal 2024: सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, चंद्रहार पाटील पिछाडीवर

सांगली लोकसभा सहाव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाला पाटील 30 हजार 701 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर; फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभेच्या निवडणकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई रंगलीय. निकालामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याच दिसत आहेत. बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय.

lok sabha nivadnuk nikal 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे, तर ठाण्यात नरेश म्हस्के आघाडीवर

साताऱ्यात चौथ्या फेरी अखेर शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. शिंदे सुमारे 20 हजार मतांनी आघाडीवर असल्याचं पााहायला मिळतंय. ठाणे लोकसभेत नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. रत्नागिरीत नारायण राणे 1734 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal: सुनील तटकरे यांना 22 हजार 900 मतांची आघाडी

सातव्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 22 हजार 900 मतांची आघाडी मिळाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरे आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आघाडीवर आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आघाडीवर, इम्तियाज जलील पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आघाडीवर तर इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत. भुमरे 1782 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal: ईशान्य मुंबईत मविआचे संजय दिना पाटील आघाडीवर

ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील १७०३२ मतांनी आघाडीवर आहेत. संजय दिना पाटील यांना ६२१६७ मतं मिळाली आहेत. मिहीर कोटेचा यांना ४५१३५ मतं आतापर्यंत मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: भिवंडीत शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आघाडीवर

भिवंडी लोकसभेत मतमोजणीच्या चौथी फेरीत शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आघाडीवर आहेत, तर कपिल पाटील पिछाडीवर आहेत. भाजपचे कपिल पाटील यांना 32194 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या सुरेश म्हात्रे यांना 39135 मतं मिळाली आहेत.

lok sabha nivadnuk nikal: नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे तर नगरमध्ये सुजय विखे आघाडीवर

नाशिक लोकसभेत मतमोजणीच्या पाचव्या फेरीत राजाभाऊ वाजे यांना 48,000 मतांची आघाडी आहे. महायुतीचे हेमंत गोडसे यांना धक्का बसताना दिसत आहे. तर अहमदनगरमध्ये तिसऱ्या फेरी अखेर सुजय विखे 2364 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत सुजय विखे यांना 7093 मतांची आघाडी मिळाली आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: बारामतीत चौथ्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर  

बारामतीमध्ये चौथ्या फेरी अखेरीस सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर एकूण मतांमध्ये सुप्रिया सुळे यांना 14 हजार 73 मतांची आघाडी होती .

Maharashtra lok sabha nivadnuk nikal 2024: मराठवाड्यात ३ जागांवर कॉंग्रेस आणि ४ चागांवर भाजप आघाडीवर

मराठवाड्याच्या आठ जागांवर तीन जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे, तर चार चागांवर भाजप आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: बारामतीत तिसऱ्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर  

तिसऱ्या फेरी अखेर एकूण मतांमध्ये सुप्रिया सुळे यांना 14 हजार 73 मतांची आघाडीवर आहे. तिसऱ्या फेरीत सुप्रिया सुळेंना 33,748 मतं मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना 31,184 मतं मिळाली आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर 

साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 5655 मतांनी आघाडीवर आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024: धुळ्यात तिसऱ्या फेरीत भाजप उमेदवार सुभाष भामरे पुढे

धुळे लोकसभा मतमोजणीमध्ये भाजपने काँग्रेसचा सात हजारांचा लीड तोडला. भाजपने 855 मतांची आघाडी घेतल्याचं दिसत आहे. दुसऱ्या फेरीत काँग्रेसला 7184 चा लीड होता. आता भाजपाला 8139 मतांचा लीड मिळाल्यामुळे तिसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे 855 मतांनी पुढे आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर 

तिसऱ्या फेरीनंतर बारामतीमधून सुप्रिया सुळे 14 हजार 73 मतांनी आघाडीवर आहेत. नागपुरातून दुसऱ्या फेरीत नितीन गडकरी आघाडीवर आहेत. तर अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर दिसत आहेत.

lok sabha nivadnuk nikal: मुंबई उत्तर पश्चिम मधून रविंद्र वायकर आघाडीवर

 मुंबई उत्तर पश्चिम मधून रविंद्र वायकर आघाडीवर आहेत. अमोल किर्तीकर यांना ७७८८ मतं मिळाली आहेत. तर रवींद्र वायकर यांना ९७१५ मते मिळाली आहे, ते १९२७ मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: पुण्यामधून दुसऱ्या फेरीत मुरलीधर मोहोळ आघाडीवर

मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे 1490 मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधून शाहू महाराज दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे. तर बीड लोकसभेच्या मतमोजणीच्या तिसरी फेरीत पंकजा मुंडे पिछाडीवर आहे. पुण्यामधून दुसऱ्या फेरीत मुरलीधर मोहोळ 12 हजार 629 मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal 2024: मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आघाडीवर

मुंबई उत्तर पश्चिममध्ये पहिल्या फेरीत अमोल किर्तीकर ११६२ मतांनी आघाडीवर आहेत. रविंद्र वायकर यांना ३ हजार ४१४ मतं मिळाली आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर १ हजार १६२ मतांनी आघाडीवर पुढे आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: चौथ्या फेरीत शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर

शिरुरमधुन चौथ्या फेरीत अमोल कोल्हेची आघाडी कायम आहे. अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजी आढळरावपाटील पिछाडीवर आहेत.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे आघाडीवर

दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे 2514 मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या चौथ्या फेरीला सुरुवात झाली आहे. चौथ्या फेरीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरुवातीलाच महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे 36 हजार 340 मतांनी आघाडीवर आहे.

lok sabha nivadnuk nikal: सांगलीत तिसऱ्या फेरीत विशाल पाटील आघाडीवर

सांगली लोकसभेत तिसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 16 हजार 561 मतांनी आघाडीवर आहेत. लातूरमध्ये पहिल्या फेरीत एक हजार मतांनी महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे आघाडीवर आहेत. महायुतीचे सुधाकर शृंगार पिछाडीवर दिसत आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: कोल्हापूरमध्ये मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड 

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. कागलची मतमोजणी होत असताना एका मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना तांत्रिक बिघाड झाला आहे.

Maharashtra lok sabha nivadnuk nikal: रत्नागिरीमध्ये नारायण राणे आघाडीवर

रत्नागिरीमध्ये नारायण राणे आघाडीवर आहेत. तर ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: कल्याण लोकसभेत दुसऱ्या फेरीत श्रीकांत शिंदे आघाडीवर

कल्याण लोकसभेत दुसऱ्या फेरीत श्रीकांत शिंदे 9474 मतांनी आघाडीवर आहे. सध्या महायुती २३ आघाडी तर मविआची २४ जागांवर आघाडी दिसत आहे. सोलापूर लोकसभेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024:  राणे साहेब मोठ्या फरकाने निवडून येतील; निलेश राणेंची प्रतिक्रिया

रत्नागिरीमध्ये राणे साहेब मोठ्या फरकाने निवडून येतील. हा माझा आत्मविश्वास आहे, अती आत्मविश्वास नाही. आम्हाला सर्व विधानसभा मतदारसंघात लीड मिळेल. खासदार विनायक राऊत यांच्याबाबत नाराजी आहे त्यांच्या आमदारांमध्ये देखील नाराजी आहे. नारायण राणे मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

lok sabha nivadnuk nikal 2024 LIVE: अहमदनगरमध्ये सुजय विखे आघाडीवर

अहमदनगर लोकसभा मतदार संघात सुजय विखे आघाडीवर दिसत आहेत. सांगली लोकसभा मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 13 हजार 800 मतांनी आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे भास्कर भगरे पहिल्या फेरीत 1435 मतांनी आघाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अमरावतीतून आघाडीवर आहेत. दक्षिण मुंबईत यामिनी जाधव 730 मतांनी आघाडीवर आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Lok Sabha Nivadnuk Nikal: नाशिकमध्ये पहिल्या फेरीत राजभाऊ वाजे आघाडीवर

नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झालीय. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे आघाडीवर आहेत. महायुतीचे हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत. सिन्नर, इगतपुरी विधानसभा मतदारसंघात वाजे यांची आघाडी कायम दिसत आहे.दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Shirur Lok Sabha Result 2024 Live: शिरूरमध्ये पहिली फेरीत अमोल कोल्हे आघाडीवर

ठाण्यात महायुतीचे नरेश म्हस्के पहिल्या फेरीत आघाडीवर आहे. मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. यवतमाळ, वाशिममध्ये मविआचे संजय देशमुख आघाडीवर आहेत. पुणे ४ विधानसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधून शाहू महाराज ८००० च्या लीडने पुढे आहेत. शिरूरमध्ये पहिली फेरीत अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. पुणे विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ पहिल्या फेरीत सुमारे ६००० मतांनी आघाडीवर आहेत.

Raigad Lok Sabha Result 2024 Live: रायगडमधून पहिल्या फेरीत महायुतीचे सुनील तटकरे आघाडीवर

रायगडमधून पहिल्या फेरीत महायुतीचे सुनील तटकरे आघाडीवर आहेत. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात मोठी चूरस पाहायला मिळतेय. इचलकरंजी भागात माने यांची आघाडी पाहायला मिळतेय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तिसऱ्या स्थानावर आहे.

Beed Lok Sabha Result 2024 Live: बीडमधून भाजप उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत पोस्टल मतदानात 146 मतांनी आघाडीवर आहेत. बीड लोकसभा मतदारसंघ - भाजप उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीअखेर भारती पवार 500 मतांनी आघाडीवर आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख 1498 मतांनी आघाडीवर आहेत. धुळेमधून डॉ. सुभाष भामरे आघाडीवर आहेत.

Osmanabad Lok Sabha Result 2024 Live: धाराशिवमध्ये पहिल्या फेरीत ओमराजे निंबाळकर यांची आघाडी  

धाराशिवमध्ये शिवसेना ओमराजे निंबाळकर यांची पहिल्या फेरीत विक्रमी मतांची आघाडी दिसत आहे. तुळजापूर, उमरगा, परंडा यासह सर्व मतदार संघात मोठी आघाडी आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना मोठा फटका बसल्याचं दिसत आहे.

Kolhapur Lok Sabha Result 2024 Live:  कोल्हापूरमध्ये पहिल्या फेरीत शाहू महाराज आघाडीवर

कोल्हापूर पहिल्या फेरीत शाहू महाराज आघाडीवर दिसत आहेत. कोल्हापूर दक्षिणची 12229 मते मोजली गेली आहेत. त्यात शाहू महाराजांना 6476, तर संजय मंडलिकांना 5440 मते मिळाली आहेत. 1036 मतांची लिड दिसत आहे.

Sangli  Lok Sabha Result 2024 Live: सांगलीत पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाला पाटील आघाडीवर 

सांगलीमध्ये पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाला पाटील आघाडीवर दिसत आहे. आज राज्यात मजमोजणीचा निकाल जाहीर होत आहेत.

Hingoli Lok Sabha Result 2024 Live:  हिंगोलीत मतमोजणी प्रक्रिया सुरू होताच मशीनमध्ये बिघाड 

हिंगोलीमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू होताच मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. सेनगाव तालुक्यात मतदान केंद्रावरील बूथवर बिघाड झाला आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी यांनी मतदान पेटी ताब्यात घेतली आहे.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Result 2024 Live: रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शाहू महाराज आघाडीवर

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत आघाडीवर

दक्षिण मध्य - राहुल शेवाळे आघाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर

परभणी - महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आघाडीवर,

महादेव जानकर पिछाडीवर आहेत.

Amravati Lok Sabha Result 2024 Live: अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर  

पोस्टल मतमोजणी प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर आहेत. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर दिसत आहेत. अमरावतीत बळवंत वानखडे आणि नवनीत राणा यांच्यात लढत होत आहे. पोस्टल मतमोजणीत बळवंत वानखडे यांना आघाडी मिळाल्याचं चित्र आहे.

Mumbai Lok Sabha Result 2024 Live: मुंबई उत्तर मध्य मतदार संघात चुरस वाढली;  सुरवातीला भाजपचे उज्वल निकम पुढे तर आत्ता वर्षा गायकवाड आघाडीवर 

मुंबई उत्तर मध्य मतदार संघात चुरस वाढली आहे. सुरवातीला भाजपचे उज्वल निकम होते पुढे तर आत्ता वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर यांची आघाडी कायम तर रविंद्र वायकर पिछाडीवर आहेत. तर मुंबई उत्तर मधून भाजपचे पियूष गोयल यांची आघाडी देखील कायम आहे.

Maharashtra Lok Sabha Result 2024 Live: राज्यात महायुती २३ तर महाविकास आघाडीचीही २३ जागांवर सर 

राज्यात महायुती २३ तर महाविकास आघाडीचीही २१ जागांवर सर दिसत आहे. निकालाचे कल समोर येत आहेत. आज राज्यात मजमोजणीचा निकाल जाहीर होत आहेत.

Shirur Lok Sabha Result 2024 Live:  शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर, पोस्टल मतमोजणी सुरु

मतमोजणीला आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निकालाचे अर्ध्यापेक्षा जास्त कल समोर आले आहेत. पोस्टल मतदानात अमोल कोल्हे यांना २३९ तर शिवाजी आढळराव पाटील यांना ५५ मते मिळाली आहेत. पोस्टल मतमोजणी अजुन सुरु आहे.

Nashik Lok Sabha Result 2024 Live:  पोस्टल मतांची मोजणी सुरू;  नाशिकमध्ये मविआचे राजाभाऊ वाजे आघाडीवर

मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे अर्ध्यापेक्षा जास्त कल हाती आले आहेत.पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये पोस्टल मतदानात राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत.

Maharashtra Lok Sabha Election Results Live :  मुंबईतून ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची आघाडी

मुंबईत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे अर्ध्यापेक्षा जास्त कल हाती आले आहेत. मुंबईच्या कलांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि अरविंद सावंत आघाडीवर आहेत. पालघरमध्ये पोस्टल मतदानात महाविकास आघाडीच्या भारती कामडी आघाडीवर तर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.

Nagpur Lok Sabha Election Results Live : पोस्टल मत पत्रिकेत नितीन गडकरी आघाडीवर

नागपूर लोकसभा मतदारसंघात पोस्टल मत पत्रिकेत नितीन गडकरी आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

West Bengal Lok Sabha Election Results Live : निकालाआधी पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट; पाचजण जखमी

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मात्र यादरम्यान पश्चिम बंगालमधील जाधवपूरमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात ५ जण गंभीर जखमी झालेत. बॉम्ब बनवताना हा भीषण स्फोट झाल्याची बंगाल पोलिसांनी दिली आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

Maharashtra Lok Sabha Result 2024 Live: राज्यात महाविकास आघाडी ४ जागांवर आघाडीवर, तर महायुती ३ जागांवर

राज्यातील सात जागांचे सुरूवातीचे कल समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी ४ जागांवर आघाडीवर आहे तर, तीन जागांवर महायुती असल्याचं दिसत आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर आहे, तर उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Result 2024 Live: छत्रपती संभाजीनगर मतमोजणी केंद्रावर गोंधळ; शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची

छत्रपती संभाजीनगर मतदान केंद्रावर आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना आत जाण्यास अडवले. वेळ संपली असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. काउंटीग एजंटलाही अडवल्याचं समोर येत आहे. उशिरा आलेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाला आहे.

Nashik Lok Sabha Result 2024 Live: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ,  उमेदवारांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्र आत सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला आहे. उमेदवाराच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Result 2024 Live: छत्रपती संभाजीनगरमध्ये टपाली मतपेट्या उघडायला सुरुवात 

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात टपाली मतपेट्या उघडायला सुरुवात झाली आहे. 8 वाजता टपाली मतदान मोजणी होणार सुरू आहे.

Kolhapur Lok Sabha 2024 Result Live: कोल्हापूरमध्ये पोस्टल पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचल्या

कोल्हापूरमध्ये पोस्टल पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. काही वेळातच मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय.

Shirdi Lok Sabha 2024 Result Live: शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठीची मतमोजणी प्रक्रिया अहमदनगर येथील वखार महामंडळ येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे.. या मतमोजणीसाठी सुमारे 1 हजार 500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शिर्डी लोकसभेसाठी 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून अंतिम निकालासाठी सायंकाळपर्यंतची वाट बघावी लागणार आहे.. शिर्डीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत झाली.

Parbhani Lok Sabha 2024 Result Live: आज परभणी लोकसभेचा निकाल; उमेदवारांची धाकधूक वाढली, जिल्ह्यात निकालाची उत्सुकता 

परभणी लोकसभेसाठी 26 एप्रिलला 2 हजार 290 मतदान केंद्रांवर 13 लाख 21 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सहा विधानसभेचा मिळून बनलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात 62.26 टक्के मतदान झाले होते. शेष म्हणजे 28 केंद्रांवर 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. आता थोडायचं वेळात मतमोजणी सुरुवात होणार असून सायंकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येणार आहेत.

परभणी लोकसभेसाठी एकूण 34 उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत. प्रामुख्याने महायुतीचे उमदेवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव याच्यात लढत आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात मत दिलीय आणि कोण खासदार होणार ह्याची उत्सुकता जिल्हाला लागली आहे.

Kolhapur Lok Sabha 2024 Result Live: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? निकालाचं काउंटडाऊन सुरू 

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर उमेदवारांचे प्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आत सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित आहे. कारण या मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे.

Nandurbar Lok Sabha 2024 Result Live: नंदुरबारमध्ये कोण फडकवणार विजयाची पताका? थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार आहे. कर्मचारी, अधिकारी यांची कसून चौकशी केली जात आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींची देखील चौकशी केल्यानंतरच आज प्रवेश दिला जात आहे.

Jalna Lok Sabha 2024 Result Live: जालना लोकसभेच्या मतमोजणीला थोड्या वेळात होणार सुरुवात; मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

जालना लोकसभेच्या मतदार मतमोजणी प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील फेस थ्रीमधील मतमोजणी केंद्रावरती प्रशासनाची लगबग वाढलीय. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी काल जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केले आहे. या अनुषंगाने मतमोजणी केंद्र बाहेर देखील पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय..

Madha Lok Sabha 2024 Result Live: माढ्याच्या लढतीकडे राज्याचे लक्ष; मतदारांचा कौल कुणाला? 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सोलापुरात मत मोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. 14 टेबलवर एकूण 20 ते 27 फेऱ्या होणार आहेत. माढा मतदारसंघासाठी 63.22% मतदान झाले आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची गणना होणार आहे. यामध्ये माढासाठी 6971 इतक्या पोस्टल मतांची मोजणी होईल. या मतमोजणी प्रक्रियेसाठी साधारणपणे सहाशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर सुमारे 900 पोलिसांचा मोठा पाऊस फाटा बंदोबस्त करिता आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत अंदाजे कल निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Pune Baramati Lok Sabha 2024 Result Live: पुणे आणि बारामतीकडे सर्वांचं लक्ष; विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?

 पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. प्रशासन आणि निवडणूक आयोगाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. सुरक्षा व्यवस्था तैण्यात करण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर आज जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत.

Chandrapur Lok Sabha Result 2024 Live: थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार, चंद्रपूरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होत आहे. मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होत आहे.

Osmanabad Lok Sabha Result 2024 Live: ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील? उस्मानाबादमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

उस्मानाबाद लोकसभेसाठी मतमोजणी प्रक्रियेला आठ वाजता सुरुवात होणार आहे. टपाली मतदान कोषागार कार्यालय येथील स्ट्राँग रूमपासून मतमोजणी केंद्राकडे रवाना झाले आहे. मोठा कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यात लढत होत आहे.

Hingoli Lok Sabha Result 2024 Live: हिंगोली लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेला आठ वाजता सुरुवात होणार 

हिंगोली लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेला आठ वाजता सुरुवात होणार आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रातील कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रात दाखल करून घेतले आहे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निवडणुकीतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करून मतमोजणी केंद्रात पाठवल आहे. दरम्यान मोबाईल, स्मार्ट वॉच, यासह इलेक्ट्रॉनिक साहित्य मतमोजणी केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई देखील करण्यात आली आहे

Nashik Lok Sabha Result Live:  नाशिक आणि दिंडोरीमध्ये मतदारांचा कौल कुणाला? थोड्याच वेळात होणार  मतमोजणीला सुरुवात  

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात आहे. नाशिकच्या अंबड वेअर हाऊसमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळतेय. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज किती मतं घेणार, यावर विजयाचं गणित ठरणार आहे. तर दिंडोरीमध्ये महायुतीच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Kalyan Lok Sabha Result Live: कल्याणचा सुभा कुणाचा? आज होणार फैसला, थोड्याच वेळात मतमोजणी

लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील  मतदानाची मोजणी २९ फेऱ्यामध्ये होणार आहे. यासाठी ८४ टेबलवर एकाच वेळी मोजणी सुरु केली जाणार आहे. मतमोजणीसाठी ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचं आवाहन आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 लाख 18 हजार 958 मतदार होते. त्यामध्ये 50.12 टक्के मतदान झालं.

Jalgaon Lok Sabha Result Live:  जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणी

जळगाव व रावेर लोकसभेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील औद्योगिक वसाहत वखार मंडळ येथे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव लोकसभेत 359 मतदान केंद्र असून 26 फेऱ्या या मतमोजणीत होणार आहे. रावेर लोकसभेसाठी 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे.

या मतमोजणी प्रक्रियेवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 39 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. 4000 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण व्यवस्था ही पार पाडण्यात आली आहे.

Pune Lok Sabha Election 2024 Results Live :  पुण्यात रविंद्र धंगेकर की मुरलीधर मोहोळ, मतदारांचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. मात्र, खरा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात झाला. दोन्ही उमेदवारांनी अतिशय आक्रमक प्रचार केला. आज निवडणुकीच्या निकालात कोणता उमेदवार विजयी होणार? याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागून आहे. पुण्यात भाजप निर्विवाद वर्चस्व राखणार का रवींद्र धंगेकर धक्का देणार? पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या सहाही मतदारसंघात ५३ टक्के मतदान झालं आहे.

Baramati Election 2024 Results Live :  सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, बारामतीचा कौल कुणाला? संपूर्ण देशाचं लक्ष

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या अतिशय रंगतदार लढत झाली. निवडणुकीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. आज बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कुणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Maharashtra Election 2024 Results Live : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार? एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अनेक संस्थांनी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात महायुतीला २४ ते २८ जागा आणि महाविकास आघाडीला २० ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यांना १८ जागा मिळू शकतात.

त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे १२ जागा, काँग्रेसला जवळपास ९ जागा आणि शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय १ जागा अपक्षाला मिळू शकते, अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असं एक्झिट पोलच्या आकडेवारीत सांगण्यात आलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Results Live : महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुरशीच्या लढती; कुणाचा होणार विजय?

महाराष्ट्रातील सर्वच ४८ लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्वच उमेदवार तुल्यबळ आहेत. बारामती लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा, पुणे लोकसभा, ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा, छत्रपती संभाजीनगर लोकसभा, बीड लोकसभा,अमरावती लोकसभा, नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या आघाडीला यश मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Lok Sabha Election Result : निवडणुकांची मतमोजणी नेमकी कशी होते? एक राऊंड किती मोठा असतो?

निवडणुकांची मतमोजणी करण्यासाठी रिटर्निंग ऑफिसर (RO) आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर (AROS) यांची निवड केली जाते. याशिवाय निवडणूक आयोगाच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी निरीक्षक म्हणून तैनात केला जातो. मतमोजणी सुरू करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी मतांची गुप्तता राखण्याची शपथ घेतात.

त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होते. साधारणत: पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मोजणी होते. या मतांची मोजणी करण्यासाठी जवळपास अर्ध्या तासांचा वेळ लागतो. त्यानंतर स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर काढले जाते. मतमोजणी सुरु झाल्यानंतर जेव्हा १४ ईव्हीएम मशिन्समध्ये टाकलेल्या मतांची मोजणी पूर्ण होते, तेव्हा एक फेरी पूर्ण झाल्याचे मानली जाते. प्रत्येक फेरीचा निकाल एकाचवेळी घोषित केला जातो.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Results Live : महायुती की महाविकास आघाडी, महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? आज मतमोजणी

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण ५ टप्प्यात मतदान पार पडलं. आज म्हणजेच मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. तसेच दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुकांचे निकाल स्पष्ट होतील. राज्यात सत्ताधारी महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार की महाविकास आघाडी बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. या निवडणुकीत दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com