Brain Eating Amoeba Saam TV
देश विदेश

Brain Eating Amoeba : मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबाचा धोका वाढला! आतापर्यंत ३ मुलांचा घेतलाय जीव, कसा होतो संसर्ग?

Ruchika Jadhav

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या विळख्यात आणखी एक मुलगा सापडला आहे. १४ वर्षीय एका मुलाला या आजाराची लागण झाली आहे. १ जुलै रोजी त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, तेव्हा त्याला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस असल्याचं डॉक्टर म्हणाले.

हा मुलगा उत्तर केरळ जिल्ह्यातील पयोली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मुलाच्या उपचारामध्ये त्याला विदेशी औषधे देण्यात आलीत. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

हा आजार कसा होतो?

मे महिन्यापासून केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत पसरली आहे. या रोगामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मेंदू खाणारा हा जिवाणू दूषित पाण्यात असतो. या पाण्यात आंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी गेल्यावर नाकामार्फत तो शरीरात प्रवेश करतो, अशी माहिती वैद्यकीय तज्ञांनी दिली आहे.

२१ मे रोजी या रोगाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. एका ५ वर्षांच्या मुलीला या रोगाची लागण झाली होती. त्यात तिचा मृत्यू झाला.

हा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण होऊ नये यासाठी बाहेर पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळा.

पावसामुळे अनेक व्यक्ती धबधबा आणि नदी अशा ठिकाणी फरण्यासाठी जातात, ते बंद केलं पाहिजे.

दूषित पाण्यापासून दूर राहा.

साठलेल्या किंवा दूषित पाण्यातमध्ये उतरू नका.

दूषित पाण्यात आंघोळ करू नका. पाणी थोडं जरी गढूळ असेल तर त्यामध्ये उतरणे टाळा.

काही कारणास्तव पावसात भीजले असाल किंवा साढलेल्या पाण्यातून घरी आले असाल, तर लगेचच गरम पाण्याने आंघोळ घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT