ramesh patil vs laxman hake : Saam tv
देश विदेश

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

ramesh patil vs laxman hake : लग्नासाठी तयार असल्याचं म्हणत मराठा आंदोलक रमेश पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

डॉ. माधव सावरगावे

रमेश पाटील यांनी लक्ष्मण हाके यांचं आव्हान स्वीकारून दर्शवली लग्नासाठी तयारी

मुंडावळ्या बांधून छत्रपती संभाजीनगरमध्ये काढली लग्नाची वरात

लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण.

रमेश पाटील यांचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

छत्रपती संभाजीनगरचे रमेश पाटील यांनी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांना मी लग्नासाठी तयार आहे असा आव्हान दिलं आहे. त्यामुळं तुम्ही मुलगी द्या, असं आवाहन करीत थेट छत्रपती संभाजीनगर शहरातून लग्नाची वरातही काढली.

काही दिवसांपूर्वी बीडमधील गेवराई येथे कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आणि ओबीसी आपण सगळे एकत्र आहोत, आमची अकरा मुलं लग्नासाठी तयार आहेत, तुम्ही आमच्या मुलांशी लग्न करा. कारण आता आम्ही तुम्ही ओबीसी आहात, आता तुम्ही पाटील क्षत्रिय वगैरे राहिले नाहीत, असे बोलले होते.

लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता रमेश पाटील यांनी थेट मुंडावळ्या बांधून नवरदेव होऊन लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी अशी मागणी केलीय. रमेश पाटील हे नेहमी चर्चेत असतात. कधी नेत्यांना फोन तर कधी सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून फोन व्हायरल करतात. त्यामुळं आता रमेश पाटील यांचा या वयातला लग्नासाठी तयार असलेला आणि मुंडावळ्या बांधून वरात करीत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

काही जणांनी रमेश पाटील यांच्या कृतीला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर उपरोधिक प्रहार असल्याचं मानलं आहे. तर काहींच्या मते या कृत्यामुळे ओबीसी-मराठा समाजात तणाव वाढले जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वतभूमीवर राज्यातील विविध भागातील स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT