Gurmeet Ram Rahim: १९ वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी Saam Tv
देश विदेश

Gurmeet Ram Rahim: १९ वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी

रणजीत हत्या प्रकरणामध्ये सीबीआयने न्यायालयाने सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहीमसह ५ आरोपींना दोषी ठरवले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : हरियाणा मधील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला सर्वात धक्का बसला आहे. १९ वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणामध्ये सीबीआयने न्यायालयाने सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहीमसह ५ आरोपींना दोषी ठरवले आहे. आता यावर १२ ऑक्टोबर दिवशी सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये राम रहीम, कृष्ण लाल, सबदील, अवतार आणि जसबीर यांना दोषी ठरवले आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणात परत एक आरोपी इंदरसेनचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रणजीत हत्या प्रकरणा मधील आरोपी डेराप्रमुखी गुरमीत राम रहीम आणि कृष्ण कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले आहे. त्याचवेळेस आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल सरळ न्यायालयात हजर होते. सीबीआय कोर्ट या अगोदर २६ ऑगस्ट दिवशी या प्रकरणी निकाल देणार होता. पण, काही कारणामुळे निकाल राखून ठेवण्यात आले आहे.

१९ वर्षे जुन्या या प्रकरणात अखेरची सुनावणी ही १२ ऑगस्ट दिवशी झाली होती. सीबीआय न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांच्या न्यायालयात साधारण अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. रणजीत सिंह यांची २००२ मध्ये हत्या करण्यात आली होती. तो डेरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असायचा. डेरा व्यवस्थापनाला संशय होता की, रणजीत सिंहने साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र त्याच्या बहिणी जवळून लिहून घेतले आहे.

रणजीतच्या हत्येप्रकरणी डेरा प्रमुख राम रहीमला आरोपी ठरवण्यात आले होते. खूपवेळा न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी पुढे ढकली होती. पण, सीबीआयने २००३ मध्ये आरोपींवियुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणि २००७ मध्ये न्यायालयाने आरोप निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, गुरमीत राम रहीमला साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये २० वर्षांची आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT