Rajya Sabha Election Saam Tv
देश विदेश

Rajya Sabha Election: कर्नाटकात काँग्रेसने मारली बाजी, तर हिमाचल प्रदेश अन् युपीत भाजपचे उमेदवार विजयी

Bharat Jadhav

Karnataka Himachal Pradesh and uttar Pradesh Rajya Sabha Election :

तीन राज्यातील राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज मतदान झाले. उत्तर प्रदेशातील १० जागांसह हिमाचल प्रदेशातील १ जागेसाठी आणि कर्नाटकातील चार जागांसाठी मतदान झालं. कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. येथे काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपचा एक उमेदवार विजयी झालाय. तर हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय. येथे भाजपचा उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झालाय.(Latest News)

हिमाचलमध्ये काँग्रेसचे ४० आमदार आहेत, मात्र काँग्रेस उमेदवाराला केवळ ३४ मते मिळाली आहेत. मात्र मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप केलाय. सीआरपीएफ आणि हरियाणा पोलिसांचा ताफ्याने ५-६ आमदारांना पळवून नेलं आहे. “ज्या पद्धतीने मतमोजणी सुरू झाली आणि विरोधी पक्ष नेते मतदान अधिकाऱ्यांना वारंवार धमकावत आहेत, ते लोकशाहीसाठी चांगले नाही. "विरोधकांनी बराच वेळ मत मोजणी थांबवली होती, असं मुख्यमंत्री सुखू म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कर्नाटकात भाजपचे (BJP) उमेदवार नारायण बंडगे विजयी झालेत, तर भाजप-जेडी(एस) उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांचा पराभव झालाय. तर काँग्रेसचे (Congress) अजय माकन, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे तिन्ही उमेदवार विजयी झालेत. अजय माकन ४७ मतांनी, नसीर हुसेन ४६ मतांनी आणि जीसी चंद्रशेखर ४६ मतांनी विजयी झाले. तीन उमेदवारांच्या विजय झाले आहेत. यावरून काँग्रेसची एकता आणि अखंडता दिसून येते. मी सर्व मतदार, मुख्यमंत्री आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानतो असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले.

उत्तर प्रदेशात भाजपचा विजय

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राज्यसभेच्या १० जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आठ उमेदवार उभे केले. तर विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने (एसपी) ३ उमेदवार उभे केले. भाजप आणि सपाकडे अनुक्रमे सात आणि तीन सदस्यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याइतके विधानसभा सदस्य आहेत, परंतु भाजपने संजय सेठ यांना आठवा उमेदवार म्हणून उभे केल्याने या निवडणुकीत रोमांच वाढला होता. दरम्यान या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झालीय. भारतीय जनता पक्षाचे ८ ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर सपाचे २ उमेदवार विजयी झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : शेतकरी हतबल...मनावर दगड ठेवून पिकावर फिरविला रोटोव्हेटर; दीड एकरातील अद्रकवर रोगाचा प्रादुर्भाव

IND vs BAN: बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा नागिण डान्स; संपूर्ण संघ १४९ धावांवर गारद, टीम इंडियाकडे मोठी आघाडी

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT