Explainer: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा मार्ग का सोपा?

Rajya Sabha Election : भाजपने अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि संघ परिवाराचे कार्यकर्ते अजित गोपचडे यांना उमेदवारी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांची, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (राष्ट्रवादी) विद्यमान राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिलीय.
 Rajya Sabha election
Rajya Sabha electionSaam Tv
Published On

Rajya Sabha election BJP And Congress:

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील दिलीय. भाजपच्या या खेळीने काँग्रेसला मोठा धक्का बसला परंतु त्याचप्रमाणे भाजप काँग्रेसला दिलासाही देताना दिसत आहे. यामुळे चव्हाण आणि काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासह रिंगणात असलेले सर्व ६ उमेदवार या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवडून येतील.(Latest News)

भाजपने अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि संघ परिवाराचे कार्यकर्ते अजित गोपचडे यांना उमेदवारी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांची, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (राष्ट्रवादी) विद्यमान राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिलीय. राज्यसभेतून ज्या खासदारांचे सदस्य जाणार आहे, त्या सदस्यांपैकी एकाही सदस्यांना उमेदवारी देण्यात आली नाहीये.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (तिघेही भाजपचे), शिवसेनेचे अनिल देसाई (उद्धव बाळासाहेब ठाकरे), ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (काँग्रेस), आणि शरद पवार यांच्या वंदना चव्हाण, या सदस्यांचं राज्यसभेतील सदस्यत्व संपृष्टात येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेना (UBT) आणि शरद पवार कॅम्पकडे विधानसभेत त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सुमारे ४२ मते मिळवण्यासाठी संख्याबळाची कमतरता आहे.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बौद्ध दलित असलेल्या हंडोरे यांच्या पराभवामुळे निर्माण होणाऱ्या वाईट दृष्टीकोनातून चौथा उमेदवार उभा करण्याच्या पक्षाच्या रणनीतीवर पुनर्विचार झाला असावा. या नेत्याने पुढे सांगितले की, पक्षाने काँग्रेसमधील विचारमंथनचं भांडवल करण्यासाठी दुसरा उमेदवार शोधण्याची तयारी केली होती. दरम्यान एका काँग्रेस नेत्याने सांगितलंय की, भाजपने माघार घेण्यामागे भाजपला मत देण्यासाठी काँग्रेसचे आमदार उघडपणे पक्षाशी संबंध तोडण्यास तयार राहणार नाहीत.

खुल्या मतपत्रिकेद्वारे होणाऱ्या निवडणुकीत अपात्रतेचा धोका पत्करावा लागेल. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष केलं जाण्याची शक्यतादेखील आहे. जून २०२२ मध्ये भाजपने तिसरा उमेदवार धनंजय (मुन्ना) महाडिक यांना उभा केला होते. महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या जवळ असलेल्या लहान पक्षांचे आमदार आणि अपक्षांच्या क्रॉस व्होटिंगमुळे तत्कालीन शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता

तर हंडोरे यांना भाजपच्या प्रसाद लाड यांच्याकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या प्रचंड क्रॉस व्होटिंगवरून टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या कारकीर्दीत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दगा फटका केला. शिंदेचा हा दगा फटका आघाडी सरकारच्या पडझडीला कारणीभूत ठरला. माजी मंत्री आणि मुंबईचे माजी महापौर हंडोरे यांनी या पराभवावर आपला राग व्यक्त केला होता.

आता चर्चा करूया या राज्यसभेतील उमेदवारीची

अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पूर्वनियोजित मानला जात आहे. मात्र कुलकर्णी आणि गोपचडे यांची नावे येणं हा आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. गोपचडे हे पेशाने डॉक्टर असून ते त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) कार्यकर्ता आहेत.

ते भाजपच्या वैद्यकीय शाखेचे प्रमुख आहेत. दरम्यान गोपचडे हे कार सेवक होते, त्यांचा बाबरी मशिदीच्या घुमटावरील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गोपचडे हे वीरशैव-लिंगायत समाजाचे आहेत, ज्यांची संख्या महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर आणि नांदेड यांसारख्या भागात लक्षणीय आहे.

२०२२ मध्ये, गोपचडे यांना राज्य विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली होती. परंतु नंतर ती रद्द करण्यात आली. चव्हाण यांच्याप्रमाणेच गोपचाडेही मूळचे नांदेडचे आहेत. कुलकर्णी हे पुण्यातील कोथरूडचे माजी आमदार आहेत. त्यांना २०१९ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी डच्चू देण्यात आला होता. पुण्यातून कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ओबीसी हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळीही मेघा कुलकर्णी यांना डावलण्यात आले होते.

या भाजपच्या निर्णयावर ब्राह्मण समाज नाराज झाला होता. त्याचा परिणाम काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या विजयात झाला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ पोटनिवडणूक झाली होती. पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा पेठ, पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मणांची संख्या लक्षणीय आहे.

कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे भाजपच्या काही नाराज मूळ समर्थक खूश होतील. कुलकर्णी जावडेकर यांच्या जागी पुण्यातील दुसरे ब्राह्मण राज्यसभेत आले आहेत. कुलकर्णी यांची राज्यसभेवर निवड झाल्याने पुण्यातील ब्राह्मणेतर नेत्याला उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पुण्यातून संभाव्य उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघ परिवार-भाजपचे जवळील सुनील देवधर उमेदवार ठरू शकतात , असा दावा केलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी न दिल्याने त्यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केलीय. त्यामुळे पक्षातील नाराजी उघड झालीय. पटेल यांचे नामांकन देखील आश्चर्यकारक आहे कारण ते २०२२ मध्ये राज्यसभेवर पुन्हा निवडून आले होते. अजित पवार गटात पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा असल्याने हा निर्णय आला असावा.

 Rajya Sabha election
BJP Meeting : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान ठरणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com