Rahul Gandhi  Saam Tv
देश विदेश

'बाबा, तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहात, मी तुमचे स्वप्न...', राहुल गांधींनी केला भावनिक व्हिडिओ शेअर

आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यासोबत एक भावनिक संदेशही लिहिला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७८वी जयंती आहे. यानिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते आपल्या वडिलांची आठवण करत भावनिक झाले आहेत. याअगोदर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राजीव गांधी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओला अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी वडील राजीव गांधी यांच्या लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. या व्हिडिओसोबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कॅप्शन लिहिली आहे. 'बाबा, तुम्ही माझ्यासोबत आहात, प्रत्येक क्षणी माझ्या हृदयात आहात. देशासाठी तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मी सदैव प्रयत्न करेन., असं या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहत आहेत. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवर राजीव गांधींना स्मरण करून एक ट्विट केले आहे. 'आम्ही भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो. 'तो भारताचा लाल होता, राजीव त्याचं नाव. त्याच्या खंबीर इराद्यानं भारतमातेचं मोल वाढवलं., अशी या पोस्टला कॅप्शन दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी पात्र ठरलेल्या टीम्स कोणत्या? पाहा 20 टीम्सची संपूर्ण यादी

Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

दिवाळीसाठी शॉपिंग करून घराकडे येताना भयंकर अपघात, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याने सोडले प्राण

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT