सोमालियात मुंबईतील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला; दहशतवाद्यांचा हॉटेलवर ताबा

सोमालियाच्या राजधानीत हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी दोन कार स्फोटानं उडवल्यानंतर बेधुंद गोळीबार केला.
Somalia Mogadishu Attack / ANI
Somalia Mogadishu Attack / ANISAAM TV
Published On

Somalia Mogadishu In Hotel Attack | मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी मुंबईवरील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी संघटना अल-शबाबने मोगादिशूतील एका हॉटेलचा ताबा घेतला.

वृत्तानुसार, सोमालियाच्या (Somalia) राजधानीत हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी दोन कार स्फोटानं उडवल्यानंतर बेधुंद गोळीबार केला. अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. (Somalia Attack)

Somalia Mogadishu Attack / ANI
Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणी महाराष्ट्र एटीएसकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सोमालियाच्या राजधानीत शुक्रवारी रात्री उशिरा हा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला असून, गोळीबारात जखमी झालेल्या नऊ नागरिकांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दहशतवादी हल्ल्यात ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मोगादिशूच्या आमीन अॅम्ब्युलन्स सेवेचे संचालक आणि संस्थापक अब्दिकादिर अब्दिरहमान यांनी दिली.

Somalia Mogadishu Attack / ANI
मोठी बातमी! मुंबईवर २६/११ सारख्या घातक हल्ल्याची धमकी; कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन कारबॉम्बने हॉटेल हयातला लक्ष्य केलं. एक कार हॉटेलजवळील बॅरियरला धडकवली. तर दुसरी कार हॉटेलच्या गेटवर धडकली. दहशतवादी हॉटेलच्या आतमध्ये घुसले. दोन अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना अल-शबाब या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. काही दहशतवादी अद्यापही हॉटेलच्या आतमध्ये लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेल हयात हे मोगादिशूमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी अन्य प्रसिद्ध हॉटेल्सही आहेत. सरकारी अधिकारी आणि नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com