मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBI च्या छाप्यानंतर १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दिल्लीत अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Manish Sisodia
Manish SisodiaSaam Tv
Published On

दिल्ली - दिल्लीत (Delhi) अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेबद्दल सीबीआयने (CBI) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर शुक्रवारी 12 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

दिल्ली सरकारच्या सेवा विभागाने जारी केलेल्या बदलीच्या आदेशानुसार, ज्यांची बदली करण्यात आली आहे त्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिव उदित प्रकाश राय यांचा देखील समावेश आहे. उदित प्रकाश हे AGMUT कॅडरचे 2007 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

हे देखील पाहा -

माहितीनुसार, लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय कुमार सक्सेना यांनी नुकतेच एका भ्रष्टाचार प्रकरणात एका कार्यकारी अभियंत्याला अन्यायकारकरित्या फायदा करून देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून उदित प्रकाश राय यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस गृह मंत्रालयाला केली होती.

या आदेशानुसार, राय यांची प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. या घडामोडींशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मनीष सिसोदिया यांच्या घरावरील छाप्याशी संबंधित नाही.

Manish Sisodia
Nashik News : भांडण सोडवण्यासाठी गेली अन् जीव गमावून बसली; महिलेसोबत घडली भयावह घटना

दुसरीकडे सीबीआयच्या छाप्यानंतर आमनीष सिसोदियाते म्हणाले की, अनेक तास शोध घेतल्यानंतर एजन्सीने त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. तसेच काही फाईल्सही ताब्यात घेतल्या आहेत. सीबीआयने शुक्रवारी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाच्या संदर्भात मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी आणि अन्य 30 ठिकाणी छापे टाकले. सिसोदिया यांच्या निकटवर्तीयाच्या कंपनीला कथितपणे 1 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

बदली झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये उदित प्रकाश राय व्यतिरिक्त जितेंद्र नारायण, विवेक पांडे, गरिमा गुप्ता आणि अनिल कुमार सिंह यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. शूरबीर सिंग, आशिष एम. मोरे, विजेंदर सिंग रावत, कृष्ण कुमार, कल्याण सहाय मीना, सोनल स्वरूप आणि हेमंत कुमार यांचा देखील समावेश आहे.

2007 बॅचचे आयएएस अधिकारी विजेंदर सिंग रावत हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे नवीन विशेष सचिव म्हणून राय यांची जागा घेतील. ते संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतील. जितेंद्र नारायण यांना दिल्ली फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुती करण्यात आली आहे.

सध्या प्रशासकीय सुधारणा सचिव म्हणून नियुक्त केलेले IAS अधिकारी विवेक पांडे यांची सचिव (IT) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांना MD (GSDL) आणि संचालकचा (UTCS) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आदेशानुसार, सध्या दिल्ली महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून सोनल स्वरूप जे सध्या दिल्ली महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत त्यांची एलजीचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com